Monday, August 3, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

संस्कृती मंत्रालय, भारत सरकार तर्फे राष्ट्रीय रांगोळी स्पर्धा उत्साहात संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
11/01/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
संस्कृती मंत्रालय, भारत सरकार तर्फे राष्ट्रीय रांगोळी स्पर्धा उत्साहात संपन्न

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर व स्व. वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठान, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. ९ जानेवारी २०२२ रोजी खुल्या राष्ट्रीय रांगोळी स्पर्धेचे आयोजन बालगंधर्व खुले नाट्य गृहात करण्यात आलं होतं. सदर स्पर्धेचे जिल्हास्तरीय आयोजन प्रतिष्ठानाने केले होते. सुमारे ४५ स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. स्पर्धेचे उद्घाटन दक्षिण-मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूरचे प्रोग्रॅम एक्झिक्युटिव्ह शशांक दंडे, प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा दीपिका चांदोरकर यांच्या हस्ते करण्यात आले.

परीक्षक म्हणून जळगाव शहरात गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांना पेंटिंग ची आवड लावून शिकवणारे श्री. तरुण भाटे, भारत विकास परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या क्षेत्रीय सचिव तसेच सहकार भारती च्या राष्ट्रीय सदस्य सौ. सुजाता खटावकर देवगिरी प्रांत भू-अलंकरण (रांगोळी) प्रमुख सौ. गीता रावतळे, जळगावच्या रांगोळी कलाकार सौ. कुमुद नारखेडे, फोटोग्राफर, वारली पैंटिंग व पोर्ट्रेट बनविणारे श्री समीर दीक्षित, यांनी केले. राष्ट्रीय स्तरावर निवड होणाऱ्या कलावंतांना सुमारे ६ लाख रुपयांची बक्षिसे दिली जाणार असून प्रत्येक स्पर्धकास सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. कोविड – १९ च्या संदर्भातील मार्गदर्शक तत्त्वानुसार या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्यामुळे हात धुवून, सॅनिटाईज करुन, मास्क वापरणे व सुरक्षित अंतर ठेवणे हे सर्व स्पर्धकांवर बंधनकारक केले होते. या स्पर्धेमध्ये स्थानिक स्तरावर स्व. वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठाना तर्फे प्रथम द्वितीय व तृतीय असे रु. १५००/-, रु. १०००/- व रु. ५००/- ची पारितोषिके बालगंधर्व संगीत महोत्सवात समारोपाच्या दिवशी वितरित केली गेली. सुमारे ४५ स्पर्धकांमधून प्रथम पारितोषिक माधुरी हितेश बारी यांना, द्वितीय पारितोषिक लेखश्री चंद्रकांत जगदाळे यांना तर तृतीय पारितोषिक रत्नप्रभा अविनाश येवले यांना मिळाले.


स्पर्धकांचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन, रांगोळीचा फोटो, रांगोळी सोबतचा सेल्फि व इतर तांत्रिक कामे निनाद चांदोरकर व डॉ. म्हणून चांदोरकर यांच्यासोबत वरून नेवे व प्रसन्न भुरे यांनी केली.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

टी.आर.पाटील महाविद्यालयात कोरोना लसीकरण शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

फैजपुरभूमीत करियर कट्टाच्या माध्यमातून युवा पिढीला घडवूया – मा श्री यशवंत शितोळे

Next Post
फैजपुरभूमीत करियर कट्टाच्या माध्यमातून युवा पिढीला घडवूया – मा श्री यशवंत शितोळे

फैजपुरभूमीत करियर कट्टाच्या माध्यमातून युवा पिढीला घडवूया - मा श्री यशवंत शितोळे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo