<
रावेर-( दिपक तायडे) – रावेर हा 118च्या वर खेडे लागू असलेला तालुका त्यात ग्रामीण रुग्णालय हा सध्या तरी खूपच महत्वाचा मुद्दा!आणि ओमीक्रॉन varient तिसरी लाट या विषया ने संपूर्ण मानवजात संकटात सापडली आहे, अर्थव्यवस्था टोठ्यात आहेत तरी सुद्धा रावेर वाशीयांना जास्त काळजी करण्याची गरज नाही त्याचे कारण असे आहे की या ग्रामीण रुग्णालयात दोन गुणी डॉ लाभलेले आहे आणि कर्मचारी सुद्धा काळजी घेणारे आहेत .
डॉ अनिकेत चव्हाण आणि डॉ सर्वेश आर्कडी यांची भेट घेतली असता त्यांनी खालील प्रमाणे खुपच छान माहिती दिली ती अशी की रावेर येथे 60 वयोगटापुढील नागरिकांना बूस्टर डोस देणे सुरू आहे, सद्या तरी कोरोना पेशंट नाही आणि आलेच तर रुग्णालयात सर्व सुविधा उपलब्ध आहेत. परंतु आता पर्यंत आदेश नाहीत.14 प्लस लसीकरणयोग्य प्रकारे सुरू आहे.
रुग्णालयात उपचारासाठी लहान 28 सिलिंडर, dura जंबो 5,आणि 30जंबो सिलिंडर आहेत आदरणीय खासदार रक्षाताई खडसे यांच्या तर्फे 16 ऑक्सिजन सिलिंडर ची मदत आहेच; त्याच प्रमाणे टेली मेडिसिन, consultation सेल्फ declaration फॉर्म भरून देतात अशी माहिती दिली व्हेंटिलेटर,बायपॅप,NIV इत्यादी सुवीधा सोडल्या तर बाकीच्या इतर सेवा उपलब्ध आहेत परंतु आदेश नाहीत .ऑक्सिजन प्लांट चे काम TRANSFARMAR अभावी बंद आहे परंतु तीन दिवसात सुरू करू असं मात्र त्यांनी सांगितले.
वरील प्रमाणे परिस्थिती रावेर रुग्णालयाची आहे योग्य त्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत परंतु आदेश अजून तरी नाहीत, अपेक्षा आहे की लवकरच आदेश येतील व नागरिकांना कोणताही वैद्यकीय त्रास होणार नाही असे विश्वास पूर्ण दोघेही डॉ अनुक्रमे डॉ अनिकेत चव्हाण आणि डॉ सर्वेश आर्किड सांगितले