<
जगात सर्वात तरुण देश म्हणून भारताचा नामोल्लेख होत असतानाच भारतीय युवक ज्ञान, सामर्थ्य, कौशल्य , संस्कार आदींच्या बळावर साऱ्या विश्वाला आदर्शवत आहे. राजमाता जिजाऊमासाहेब व स्वामी विवेकानंद ही दोन दैवतं तरुणांसाठी प्रेरक असून त्यांचे आचार, विचार आणि संस्कार प्रत्यक्ष जीवनात आत्मसात करने हीच खरी आदरांजली असेल असे प्रतिपादन लेफ्टनंट डॉ.राजेंद्र राजपूत यांनी केले.
तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऑनलाइन राष्ट्रीय युवादिवसाच्या औचित्याने मार्गदर्शन पर कार्यक्रमात विवेचन करताना या कार्यक्रम प्रसंगी केंद्र सरकार, राज्य सरकार व स्थानिक प्रशासन यांच्या आदेशांच्या आधिन राहून कोरोना प्रतिबंधक उपाय योजनांची काळजी घेऊन राष्ट्रीय युवक दिवस ऑनलाइन पद्धतीने साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे मा.प्राचार्य डॉ.पी. आर. चौधरी, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.दीपक सूर्यवंशी, सहा. कार्यक्रम अधिकारी प्रा शेरसिंग पाडवी , महिला सहा. कार्यक्रम अधिकारी डॉ सरला तडवी व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेटस यांच्यासोबत असंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ दीपक सूर्यवंशी यांनी केले. त्यात त्यांनी राष्ट्रीय युवादिवसाच्या कार्यक्रमाचा उद्देश व राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांचा जीवन परिचय करून दिला. यासोबत समाजाला प्रेरक महाविभूतींचे विचार प्रत्यक्ष जीवनात आचरणात आणावे असे आवाहन केले.
लेफ्टनंट डॉ. राजेंद्र राजपूत यांनी राष्ट्रमाता जिजाऊमासाहेब व स्वामी विवेकानंद यांचा जीवन परिचय करून देतानाच विद्यार्थ्यांनी जीवनात उच्चतम ध्येय ठेवून त्याच्या प्राप्तीसाठी झोकून देऊन प्रयत्न करावेत, यासोबत वेळेचे नियोजन, पुस्तकांशी मैत्री व वेगवेगळे छंद जोपासून आयुष्याला बहुआयामी करावे. ‘आये हो इस दूनिया मे कोई किरदार निभाने के लिए कुछ ऐसा कर चले ही दुनिया मिसाल दे ‘ अशा उस्फुर्त शायरीतून उपस्थित विद्यार्थ्यांची दाद मिळवली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सरला तडवी यांनी तर आभार प्रा.शेरसिंग पाडवी यांनी मानले.