<
जळगाव (प्रतिनिधी) केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित सेवावस्त्ती विभागाच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधत माउली भजन मंडळाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी भजनी मंडळाच्या अध्यक्षा चंद्रकला हटकर व शोभा पाटील यांनी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले.
भजनी मंडळाच्या माध्यमातून जिजाऊ व स्वामी विवेकाननंद यांचे विचार सर्व समाजापर्यंत पोहचविण्यासाठी भजनी मंडळाचा प्रारंभ केला असल्याची माहिती व्यवस्थापिका स्नेहा तायडे यांनी दिली. संस्कार वर्गातील विद्यार्थांनी जिजाऊयांचे कार्य सर्वांसमोर भाषणाच्या माध्यमातून मांडले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सेवावस्ती विभागाच्या स्नेहा तायडे राधिका गरुड, कांचन सांगोळे, मंगला अहिरे यांनी परिश्रम घेतले.