Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’निमित्त महाराष्ट्र परिचय केंद्राचे विविध उपक्रम

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/01/2022
in राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’निमित्त महाराष्ट्र परिचय केंद्राचे विविध उपक्रम

नवी दिल्ली, दि. १३ : ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’निमित्ताने महाराष्ट्र परिचय केंद्राच्या समाज माध्यमांवरून मराठीच्या विविध पैलूंवर आधारित ट्विटर मोहीम, लघुपट प्रक्षेपण आणि मराठी भाषेच्या महतीवर आधारित व्याख्यानांचे पुन:प्रसारण करण्यात येणार आहे.

मराठी भाषा विभागाच्या सूचनेनुसार १४ ते २८ जानेवारी दरम्यान ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’चे राज्यात व राज्याबाहेरील शासकीय तसेच निमशासकीय  कार्यालयांमध्ये आयोजन करण्यात येते.यावर्षी कोविड -१९ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र परिचय केंद्रही  विविध कार्यक्रमाचे ऑनलाईन आयोजन करणार आहे.

विशेष ट्विटर मोहीम आणि लघुपट प्रसारण  

शुक्रवार, १४ जानेवारीपासूनच परिचय केंद्राच्या मराठी ट्विटर हँडलवर मराठी खाद्य संस्कृती,सांस्कृतिक वारसा, साहित्य -नृत्य -वस्त्र-आभूषण आदि परंपरांच्या माहितीवर आधारित  विशेष ट्विटर मोहीम राबविण्यात येणार आहे. मराठीसह परिचय केंद्राच्या हिंदी व इंग्रजी ट्विटर हँडलवरही ही मोहीम राबविण्यात येणार आहे. यासोबतच परिचय केंद्राच्या सर्वच समाज माध्यमांवर १६ जानेवारी रोजी ‘शांतता! मराठीच कोर्ट चालू आहे’ या लघुपटाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

मराठीची महती सांगणाऱ्या पाच व्याख्यानांचे पुन:प्रसारण

मराठी भाषा संवर्धन पंधरवडाच्या औचित्याने परिचय केंद्राच्या हिरकमहोत्सवी व्याख्यानमालेतील मराठीची महती सांगणाऱ्या निवडक पाच व्याख्यानांचे पुन: प्रसारण करण्यात येणार आहे.

‘आधुनिक महाराष्ट्रातील मराठी वाड्मयाची ओळख’ विषयावर १८ जानेवारी रोजी ख्यातनाम साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांचे व्याख्यान, २१ जानेवारी रोजी ‘महाराष्ट्राची शाहिरी पंरपरा’ विषयावर प्रसिध्द शाहीर संभाजी भगत ,२४ जानेवारीला ‘वारी : परंपरा आणि स्वरूप’ विषयावर संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांच्या व्याख्यानाचे पुन: प्रसारण करण्यात येणार आहे.

२५ जानेवारीला खासदार तथा दै.सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांचे ‘जगाच्या पाठीवरील मराठी’ विषयावर आणि २८ जानेवारीला  मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे प्रमुख डॉ.  गणेश चंदनशिवे यांच्या ‘महाराष्ट्रातील लोककला आणि प्रबोधन’ विषयावरील व्याख्यानाच्या पुन: प्रक्षेपणाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडयाचा समारोप होणार आहे.

समाज माध्यमांहून लघुपट प्रसारण व व्याख्यानांचे पुन: प्रसारण होणार

 मराठी  भाषा  संवर्धन पंधरवडानिमित्त एक लघुपट आणि पाच व्याख्यानांच्या पुन: प्रसारणाची वेळ दुपारी ४ वाजताची राहील. परिचय केंद्राच्या अधिकृत ट्विटरहँडल, फेसबुक, युटयूब चॅनेलहून प्रसारण होणार आहे. अधिकाधिक लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

 हे  व्याख्यान परिचय केंद्राचे ‍मराठी  ट्विटर हँडल https://twitter.com/MahaGovtMic, हिंदी ट्विटर हँडल https://twitter.com/MahaMicHindi आणि ‍ इंग्रजी ट्विटर हँडल https://twitter.com/micnewdelhi   वर लाईव्ह पाहता येणार आहे. तसेच  कार्यालयाचे फेसबुक प्रोफाईल https://www.facebook.com/MICNEWDELHI  , फेसबुक पेज https://www.facebook.com/micnewdelhiPR/   आणि फेसबुक मिडीया ग्रुप https://www.facebook.com/groups/525576297610799/?ref=share  वर पाहता येणार आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

इंडिया ओपन २०२२ मधील यशाबद्दल नागपूरकर मालविका बनसोड हिचे पालकमंत्र्यांनी केले अभिनंदन

Next Post

नक्षलग्रस्त भागातील मतदारांचा आदर्श शहरी मतदारांनी घ्यावा : देवेंद्र गावंडे

Next Post
नक्षलग्रस्त भागातील मतदारांचा आदर्श शहरी मतदारांनी घ्यावा : देवेंद्र गावंडे

नक्षलग्रस्त भागातील मतदारांचा आदर्श शहरी मतदारांनी घ्यावा : देवेंद्र गावंडे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d