<
फैजपूर – (प्रतिनिधी) – येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात कै दामोदर नाना चौधरी क्षमता विकास प्रबोधिनी अंतर्गत पीएचडी एंट्रन्स टेस्ट पेपर 1 जनरल ऐप्टिट्यूड साठी पाच दिवसीय ऑनलाइन वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी आर चौधरी यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी डॉक्टर एस व्ही जाधव समन्वयक- कै दामोदर नाना चौधरी क्षमता विकास प्रबोधिनी तथा विभागप्रमुख मानसशास्त्र विभाग, लेफ्टनंट डॉ राजेंद्र राजपूत, दीपक पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव च्या वतीने दरवर्षी पी एच डी एनट्रान्स टेस्ट चे आयोजन करण्यात येते. मात्र यासाठी संशोधकांना विद्यार्थ्यांना प्रवेश पात्रता परीक्षा द्यावी लागते.
या पात्रता परीक्षेची संपूर्ण तयारी व्हावी या उद्देशाने सद्यस्थितीत कोरोना विषाणू प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर ऑनलाइन पाच दिवसीय वर्कशॉपचे आयोजनदिनांक 17 ते 21 जानेवारी 2022 दरम्यान करण्यात आले आहे. यासाठी जळगाव, धुळे आणि नंदुरबार परिक्षेत्रातील सुमारे 70 संशोधक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून आजच्या पहिल्या दिवशी 32 संशोधक विद्यार्थी हजर होते.
या कार्यशाळेच्या पहिल्या दिवसाच्या सत्रात डॉ सीमा बारी यांनी रिसर्च ऐप्टिट्यूड या विषयावर सादरीकरण केले. त्यांनी संशोधनाची मूळ संकल्पना, नीती तत्वे, प्रक्रिया व संशोधनासाठी लागणारे रिसोर्सेस कशाप्रकारे मिळवावेत आणि त्यांच्या वापर करावा यावर सखोल मार्गदर्शन केले.
यावेळी उपस्थित सहभागी संशोधक विद्यार्थ्यांनी त्यांच्या शंकांचे निरसन करून घेतले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी आर चौधरी यांनी उद्घाटन समारंभ प्रसंगी संशोधन करू इच्छिणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात उपलब्ध सोयी-सुविधांचा लाभ करून घ्यावा व समाज उपयोगी संशोधन करून शैक्षणिक क्षेत्रात बहुत भरीव कामगिरी करावी असे आवाहन केले.
या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी तापी परिसर विद्या मंडळ मंडळाचे अध्यक्ष मा श्री शिरीषदादा मधुकरराव चौधरी, आमदार यावल / रावेर विधानसभा मतदार संघ, सर्व सन्माननीय संस्था पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी आर चौधरी, सर्व सन्माननीय उपप्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, कै दामोदर नाना चौधरी क्षमता विकास प्रबोधिनी समितीचे सर्व सदस्य मार्गदर्शन व सहकार्य करीत आहेत.