<
जळगाव, दि. 17 (जिमाका वृत्तसेवा) : सांगवी (ता. यावल, जि. जळगाव) येथील सांगवी ते भालेाद रस्त्यवर हरी बाकरोले यांच्या शेताजवळ रस्त्यालगतच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात एका पिश्वीत स्त्री जातीचे बाळ निराधार अवस्थेत आढळून आले आहे. तिला साकार सोसायटी फॉर अॅडोप्शन नॉलेज अवेरनेस ॲण्ड रिसोर्स साकार संस्था, औरंगाबाद या शिशुगृहात पुढील पुनवर्सनाकरीता पाठविण्यात आलेले आहे. तिचे स्नेहा असे नामकरण करण्यात आले असून सदरच्या बालिकेस 26 ऑक्टोबर 2021 रोजी साकार सोसायटी फॉर अॅडोप्शन नॉलेज अवेरनेस ॲण्ड रिसोर्स, साकार संस्था, औरंगाबाद या शिशुगृहात पुढील पुनर्वसनाकरीता पाठविण्यात आलेले आहे.
स्नेहाचे पालक व नातेवाईकांनी 30 दिवसांच्या आत बाल कल्याण समिती जळगाव दूरध्वनी क्र. 0257-2239550 साकार संस्था औरंगाबाद व बाल कल्याण समिती, औरंगाबाद दूरध्वनी क्रमांक 0240-2347099,9673101760 तसेच जिल्हा बाल संरक्षण कक्ष , जळगाव दूरध्वनी क्र. 0257-2228825, येथे संपर्क साधावा. या बालिकेचे कोणी पालक, नातेवाईकांनी संपर्क न केल्यास मा. अध्यक्ष, बाल कल्याण समिती, औरंगाबाद यांच्या आदेशाने बालकाच्या पढील पुनर्वसनाची प्रक्रिया करण्यात येईल, असे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, जळगाव यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.