<
जळगाव, दि. 17 (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यातील कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत नोंदणीकृत व विविध प्रशिक्षण अभ्यासक्रम राबविणाऱ्या व्हीटीपी-व्यवसाय प्रशिक्षण देणाऱ्या संस्था, व्हीटीआय-व्होकेशनल ट्रेनिंग इन्टि ट्यूट आणि नोंदणीच्या प्रतीक्षेत, इच्छुक असणाऱ्या व्यवसाय प्रशिक्षण संस्थां स्कील इंडिया पोर्टलवर (TP-Training Provider & TC – Training Centre) नोंदणी करणे आवश्यक आहे.
नोंदणीच्या संपूर्ण प्रोसेसमध्ये आपले (TP- TC) हे Fully Accrediated – मान्यता & Fully Affiliated – संलग्नता होईल याची दक्षता घ्यावी. संस्थेची / सेंटरची स्कील इंडिया पोर्टलवर Fully Accrediated – मान्यता & Fully Accrediated संलग्नता प्राप्त झाल्यानंतर कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात विविध अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण उमेदवारांना देणे शक्य होईल. स्कील इंडिया पोर्टलवरील नोंदणी व इतर अनुषंगिक माहितीसाठी पुढील लिंकचा उपयोग करावा. Link :- https://skillindia.gov.in कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त प्रशिक्षण कार्यक्रम राबविणाऱ्या संस्था/सेंटर यांनी स्कील इंडिया पोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन वि.जा. मुकणे, सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांनी केले आहे. याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयीन वेळेत महेश चौधरी जिल्हा कौशल्य विकास समन्वयक यांच्याशी कार्यालयील वेळेत प्रत्यक्ष संपर्क साधावा. असेही आवाहन करण्यात आले आहे.