जळगांव(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव जिल्हा महानगर तर्फे आजपासुन दररोज सकाळी 11 ते 1 या वेळेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी यांनी जनता दरबाराचे आयोजन केले आहे. सदर जनता दरबारात नागरिकांनी त्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्या मांडाव्यात असे आवाहन पक्षातर्फे करण्यात आलेले होते. त्याअनुषंगाने आज रोजी सोमवार दिनांक 17 जानेवारी 2022 पासुन नागरिकांनि राष्ट्रवादी कार्यालयात येऊन आपल्या समस्या तोंडी व लेखी स्वरूपात मांडल्यात यात प्रामुख्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे कोविड रुग्णांना सुविधा मिळत नसलेबाबत व इतरही विषयी समस्या मांडण्यात आल्यात त्यानुसार तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांना निवेदन देण्यात आले. तसेच ईच्छादेवी चौकात सर्कलचे काम सुरू असुन त्या सर्कलला ईतर कुठलेही नाव देऊ नये फक्त ईच्छा देवी चौक याच नावाने हा सर्कल ओळखला जावा यासाठी ईच्छादेवी परिसरातील नागरिकांसोबत आयुक्त व महापौर यांना निवेदन देण्यात आले. यासह तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय व विविध शासकीय कार्यालयातील समस्या नागरिकांनि मांडल्या आहेत. या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील याविषयी संबंधित नागरिकांना आश्वस्त करण्यात आलेले आहे. तसेच सदर जनता दरबारात नागरिकांनी यापुढेही त्यांच्या समस्या मांडाव्यात असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टि जळगाव जिल्हा महानगरतर्फे करण्यात आलेले आहे. याप्रसंगी एजाजभाई मलिक, डॉ. रिजवान खाटिक, अमोल कोल्हे, सुनील माळी, भगवान सोनवणे, सुशील शिंदे, विशाल देशमुख, सुहास चौधरी आदी उपस्थित होते.