<
धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर व मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा 2022 या अंतर्गत घेण्यात आलेल्या प्रथम कार्यक्रमात प्राचार्य आनंद भंडारे यांनी मराठी भाषा महत्व आणि उपयोजन या विषयावर अनमोल असे मार्गदर्शन केले.याप्रसंगी धनाजी नाना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पी.आर. चौधरी यांनी अध्यक्षपद भूषविले. या आभासी कार्यक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थी व प्राध्यापक वर्ग उपस्थित होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.मनोहर सुरवाडे, मराठी विभाग प्रमुख यांनी केले. तसेच पाहुण्यांचा परिचय आणि कार्यक्रमाची रूपरेषा मांडली. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्राचार्य आनंद भंडारे यांनी मराठी भाषा शिलालेख व ताम्रपट तसेच आधुनिक युगात झालेला भाषेचा प्रवाह त्याच बरोबर संवाद साधण्यासाठी वापरण्यात येणारी मराठी भाषा तिचे स्वरूप महत्व आणि उपयुक्तता आपल्या भाषणातून मार्गदर्शनातून कथन केली. संत पंत आणि तंत तसेच आधुनिक युगात वापरली जाणारी भाषा तिचे महत्त्व प्रतिपादन केले.या आभासी कार्यक्रमाप्रसंगी डॉ. मनोहर सुरवाडे डॉ. दीपक सूर्यवंशी प्राध्यापिका पल्लवी पाटील डॉ.आर आर राजपूत व मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी होते, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर शरद बिराडे यांनी केले तर आभार प्राध्यापिका उन्नती चौधरी यांनी मानले. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा याचे दुसरे पुष्प कथाकथन या कार्यक्रमाने गुंफले जाणार आहे हा कार्यक्रम 24 जानेवारी 2022 पार पडणार आहे.