<
जळगांव(प्रतिनिधी)- कोरोनाच्या काळात हातमजुरी करणारे,असंघटित मजूर, विधवा व निराधार ,गरीब लोकांचे रेशन कार्ड नसल्या मुळे आणि केशरी रेशन कार्ड वर प्राधान्य क्रम कुटुंब असा शिक्का नसल्या मुळे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले ते लक्षात घेवून लोकसंघर्ष मोर्चा राष्ट्रीय अध्यक्ष प्रतिभाताई शिंदे यांनी सर्व गरिबांना न्याय मिळवण्यासाठी कॅम्प घेतलेत व आज अश्या शेकडो लाभार्थीना आझाद नगर येथे प्रत्यक्ष लाभ मिळवून देत कार्ड वाटप केले ह्या वेळी लोक संघर्ष मोर्चाच्या प्रतिभाताई शिंदे जळगाव नगरीचे उपमहापौर मा कुलभूषण भाऊ पाटील, लोक संघर्ष मोर्चा च्या युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष भरत कर्डिले ,लोक संघर्ष मोर्चा मोईन्यारिटी सेल चे अध्यक्ष फारुख भाई कादरी,आझाद फाऊंडेशन चे तैमूर भाई, इम्रान भाई आदी उपस्थित होते. ह्या वेळी रेशकार्ड मिळालेल्या व धान्य चालू झालेल्या शेकडो नागरिकांनी लोक संघर्ष मोर्चाचे आभार मानले.