Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

Ajay Chaudhary’s participation in Rajpath Delhi-अजय चौधरी याची राजपथ दिल्ली येथे पथसंचलनात सहभाग

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
24/01/2022
in जळगाव, राज्य, राष्ट्रीय
Reading Time: 1 min read

फैजपूर येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेनेचे कैडेट व वाणिज्य विभागाच्या प्रथम वर्ष बी कॉम चा विद्यार्थी अजय दौलत चौधरी यांची 26 जानेवारी प्रजासत्ताक दिवसाच्या औचित्याने आयोजित दिल्ली येथे राजपथावर पथसंचलनासाठी महाराष्ट्र डायरेक्टरेट च्या वतीने निवड करण्यात आली आहे.

राष्ट्रीय छात्र सेनेच्या माध्यमातून देशातील युवा पिढीला एकता आणि शिस्त या माध्यमातून भारतीय सशस्त्र सेनेच्या पूर्वतयारी चे प्रशिक्षण दिले जाते. सद्यस्थितीत राष्ट्रीय छात्र सेना जगातील सर्वात मोठी युनिफॉर्म यूथ ऑर्गनायझेशन असून आर डी सी कॅम्प दिल्ली साठी निवड होणे सर्वच कैडेट्स चे स्वप्न असते.

यात रणगाव तालुका रावेर येथील श्री दौलत अभिमन चौधरी व प्रमिला दौलत चौधरी या अत्यंत स्वाभीमानी, प्रामाणिक, मेहनती आणि अत्यंत संस्कारक्षम पालकाच्या पोटी जन्मलेल्या अजय याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेऊन धनाजी नाना महाविद्यालयात एनसीसीत प्रवेश मिळवला.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी आर चौधरी व एनसीसी अधिकारी लेफ्टनंट डॉ राजेंद्र राजपूत यांच्या मार्गदर्शनानुसार अत्यंत कठीण मेहनत व कठोर परिश्रम घेऊन अजय दौलत चौधरी याने देशपातळीवर महाराष्ट्र राज्याचे नाव उज्वल केले आहे. महाविद्यालयाच्या वतीने याआधी विवरे येथील प्रा भारत दिलीप पाटील व गहुखेड़ा येथील चंद्रकांत मधुकर पाटील या केडेट्स नेही दिल्ली दरबारी महाविद्यालयाची सुवर्ण नोंद केली होती.
या शिरोपेचात अजय दौलत चौधरी यांनी मानाचा तुरा रोवला असल्याची भावना लेफ्टनंट डॉ राजेंद्र राजपूत यांनी यावेळी व्यक्त केली.

अजय चौधरी याने दिल्लीच्या राजपथ येथे पथसंचलनात स्वतःच्या मेहनतीने व परिश्रमाने स्थान मिळवून आमचा गौरव केला आहे व हा आनंद आयुष्यभर संस्मरणीय असेल अशी भावना अजय चे वडील दौलत चौधरी यांनी यावेळी व्यक्त केली.

तापी परिसर विद्या मंडळाचे अध्यक्ष मा श्री शिरीषदादा मधुकरराव चौधरी आमदार- रावेर/ यावल विधानसभा मतदार संघ, उपाध्यक्ष प्रा डॉ सुधाकर काशिनाथ चौधरी, उपाध्यक्ष श्री मिलिंद बापू वाघुळदे , चेअरमन श्री लीलाधर विश्वनाथ चौधरी, व्हाइस चेअरमन प्रा किशोर रामदास चौधरी, सचिव प्रा मुरलीधर तोताराम फिरके, सहसचिव अनिल नंदकुमार भंगाळे, सर्व व्यवस्थापन व नियामक मंडळ पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी आर चौधरी, उपप्राचार्य डॉ उदय जगताप, उपप्राचार्य डॉ अनिल भंगाळे, उपप्राचार्य प्रा अनिल सरोदे, उपप्राचार्य प्रा दिलीप तायडे, समादेशक अधिकारी 18 महाराष्ट्र बटालियन एनसीसी जळगाव कर्नल प्रवीण धीमन, प्रशासकीय अधिकारी लेफ्टनंट कर्नल पवन कुमार, सुभेदार मेजर कोमलसिंग, सुभेदार जयपाल सिंग, सुभेदार जय बहादुर यांच्यासोबत महाविद्यालयाचे सर्व सन्माननीय प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, कॅडेटस व विद्यार्थी यांनी कौतुक केले आहे.
अजय चौधरी याचे अभिनंदन समाजातील सर्वच स्तरातून होत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

लोक संघर्ष मोर्चा तर्फे आझाद नगर येथे लाभार्थीना रेशन वाटप कार्यक्रम संपन्न

Next Post

डॉ. कुंदनदादा फेगडे आयोजित निशुल्क नेत्र तपासणी शास्त्रक्रिया शिबिरास उत्तम प्रतिसाद

Next Post
डॉ. कुंदनदादा फेगडे आयोजित निशुल्क नेत्र तपासणी शास्त्रक्रिया शिबिरास उत्तम प्रतिसाद

डॉ. कुंदनदादा फेगडे आयोजित निशुल्क नेत्र तपासणी शास्त्रक्रिया शिबिरास उत्तम प्रतिसाद

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d