<
शेख शोहेब शेख समद भुसावल सोबत
डावी कडून वधु चे वडील सय्यद मुजफ्फर, नसीर शेख बुरहानपुर, सय्यद चांद , फारूक शेख , वराचे वडील शेख अ. समद भुसावल, हाजी रऊफ नसीराबाद, हाजी हारून भुसावल, सलिम शेख भुसावल, सय्यद हमीद सय्यद हारून भुसावल, सय्यद अकील भुसावल, तसेच युसुफ शाह अल खैर ट्रस्ट जलगांव दिसत आहे
मागील आठवड्यात जळगाव जिल्हा मनियार बिरादरी च्या माध्यमाने चार साखरपुडयाचे विवाहत रूपांतरित झाल्याने त्यावेळेस बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांनी केलेल्या आवाहनानुसार भुसावळ येथील वर शेख शोएब शेख समद यांनी जळगाव येथील मन्यार वाड्यातील सय्यद आयेशा सिद्दिका मुजफ्फर हिच्यासोबत मार्च मधे लग्न निश्चित झालेले असल्याने त्यांनी आज २३ जानेवारी, रविवारी जळगावात सकाळी दहा वाजता येऊन जामा मस्जिद येथे मौलाना उस्मान कासमी यांच्या माध्यमाने निकाह करून घेतला आणि त्वरित आपल्या पत्नीची बिदागीरी घेऊन भुसावळ येथे रवाना झाले
जळगाव येथे वधूकडे कोणत्याही प्रकारची जेवणावलीचा कार्यक्रम न करता फक्त चहापानावर हा विवाह संपन्न झाला.
या विवाहाचे वकील ची भूमिका चाळीसगावचे सय्यद रमजान सय्यद रहीम तर साक्षीदार ची भूमिका अब्दुल रऊफ शेख नशिराबाद व शेख हारुन हसन भुसावळ यांनी पार पाडली.
भुसावळ येथील वराकडील फक्त १२ लोकांची तर वधूकडील फक्त १५ लोकांची उपस्थिती हे या विवाहाचे प्रमुख वैशिष्टे होते.
वराकडील मंडळींनी कोणत्याही प्रकारचे भांडीकुंडी, पलंग न घेता जेवण सुद्धा न करता वधूला आपल्या सोबत घेऊन गेले व दुपारी भुसावल येथे जेवणाचा (वलीमा) कार्यक्रम ठेऊन त्यात वधु कडील मंडळीला आमंत्रित करून बिरादरी मध्ये एक चांगले उदाहरण देऊन समाजाला दिशा दिल त्यांच्या या कार्यात वराचे वडील शेख समद वधूचे वडील शेख मुजफ्फर यांच्यासह नशिराबादचे हाजी हारून सलीम शेख, सय्यद अकील, यांच्यासह जळगावचे फारुक शेख, सैय्यद चाँद, यूसुफ शाह, यांनी योग्य ती भूमिका निभावली. या निकाह चे सर्वदूर कौतुक होत आहे.