<
जळगांव दिनांक २५ जानेवारी २०२२
प्राचार्य डॉ. राकेश चौधरी यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना संबोधित करतानां “दैनंदिन जीवनात सर्व सामान्य जनतेला उत्कृष्ट लोकशाही व उत्तम सुशासन मिळावे या करिता नवमतदारनीं मतदान प्रक्रिये मध्ये उत्सव , सोहळे समजून सहभागी व्हावे” समाजकार्य महाविद्यालयात “निवडणूक साक्षर मंडळाची स्थापना” करुन सामाजिक अभियंत्यांनी आप-आपल्या परिसरातील अथवा क्षेत्रकार्य संस्थे अंतर्गत येणाऱ्या नवमतदारांना या प्रक्रियेत सहभागी करून घ्यावे.
नवमतदार जनजागृती दिनानिमित्त महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी विद्यार्थ्यांकडून नवमतदार जनजागृती साठी प्रतिज्ञाचे पठण करवुन घेतले. विद्यापीठाच्या परिपत्रकानुसार विद्यार्थ्यांनी निवडणूक साक्षर मंडळांतर्गत घोषवाक्य , मीम , लघुपट , वकृत्व , चित्रकला , गाणे. या विविध कलाप्रकार यांमध्ये सहभाग नोंदवावा या अपेक्षा प्राचार्य डॉ. चौधरी यांनी व्यक्त केल्यात.
स्वयं प्रेरणेने बी. एस. डब्ल्यू. प्रथम वर्षाच्या रिद्धी कापडे या विद्यार्थिनीने उस्फुर्त प्रतिसाद देत “हर हर एक घर में लोग हैं | उनके हात में एक वोट हैं |
क्या करे जनजागृती करना हमारा फर्ज हैं |
वोट देना उनका अपना कर्तव्य हैं |
हर हर एक घर में लोग हैं | उनके हात में एक वोट हैं |” कविता सादर केली.
धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचलित , लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने दि. २५ जानेवारी “राष्ट्रीय मतदार जनजागृती दिन” महाविद्यालयात संपन्न झाला.
या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राकेश चौधरी , प्रमुख वक्ते विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. शाम सोनवणे , राष्ट्रीय सेवा योजनेचे विभागीय समन्वयक डॉ. नितीन बडगुजर , राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. निलेश शांताराम चौधरी , विद्यार्थी विकास महिला अधिकारी डॉ. सुनिता चौधरी आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक तथा महाविद्यालयाचे विद्यार्थी गूगल मीट च्या साह्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. निलेश शांताराम चौधरी यांनी केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि विद्यार्थी विकास विभागांतर्गत विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा याकरिता अनेक कार्यक्रमांचे आयोजन या विभागांतर्गत केले जाते. समाज प्रबोधन ,जनजागृतीपर कार्यक्रमा मध्ये राष्ट्रीय सेवा योजना मधील विद्यार्थ्यी एकाकांचा जास्तीत जास्त सहभाग वाढावा या दृष्टीने देखील कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. आणि यातूनच खर्या अर्थाने राष्ट्र विकासासाठी निपुण युवा नेतृत्व हे समाजापुढे सातत्याने येत असतात.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. डॉ शाम सोनवणे यांनी नवमतदारांना मार्गदर्शन करताना सांगितले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेली संविधानातील लोकशाही निर्माण करण्यासाठी आपल्याला मिळालेल्या मतांचा योग्य वापर करणे, समाजकार्याच्या विद्यार्थ्यांनी जनजागृती करणे, वंचितांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचवून त्यांच्या अधिकारांची जाणीव करून देणे, मतदान करणे, आपलं मत हा आपला आवाज आहे. आपला अधिकार आहे. सक्षम लोकशाहीचा आधार आहे. त्यामुळे जागरूक आणि जबाबदार मतदार बनूया. हे आपल्या प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे. चला आपण मतदार जनजागृती दूत बनवूया.. याबाबत संवेदनशील राहून जनजागृती केली पाहिजे.
आज आपण १२ वा राष्ट्रीय नवमतदार जनजागृती दिन साजरा करिता आहेत. हे लक्षात आणून देत असतांना आपल्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती सन्माननीय प्रतिभाताई पाटील यांनी ६१ व्या गणराज्य दिनानिमित्त जनतेला संबोधित असतानां २५ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय नवमतदार जनजागृती दिन साजरा केला जावा हि घोषणा केली. आजचा कार्यक्रम हा त्याचाच परिपाक आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. निलेश शांताराम चौधरी यांनी केले.