<
पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांचा सत्कार करताना फारुक शेख डावीकडूनअनवर सिकलगर, दानिश सैयद,शाहिद सैयद,अयाझअली,अहेमद सर,फारूक कादरी,नाजीम पेंटर आदी दिसत आहे
जळगाव – (प्रतिनिधी) – उस्मानिया पार्क येथील राहणारे अब्दुल गफ्फार जब्बार यांचा मृतदेह २७ जानेवारी रोजी दुपारी ममुराबाद येथील रस्त्यावर मिळाल्याने सदर प्रकार हा खुनाचा असल्याचे लक्षात आल्याने जळगाव शहरातील मुस्लिम समुदायाने जळगाव पोलीस विभागाला विनंती केली होती की सदर मृत्यूला जवाबदार असलेल्या गुन्हेगाराना २४ तासाच्या आत पकडून त्याच्यावर कारवाई करा त्याप्रमाणे पोलिसांनी दुपारपासून मध्यरात्रीच्या आत सुमारे ९ तासामध्ये दोघी आरोपींना जेरबंद करून आपले कर्तव्य सिध्द केल्याचे जळगावकरांना दाखवून दिले त्यांच्या या कर्तव्यदक्ष तेचा समाजाने सुद्धा परतफेड करण्याचा एक छोटासा प्रयत्न केला.
पोनी किरणकुमार यांचा गौरव
जळगाव जिल्हा मानियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांनी जळगाव शहरातील सय्यद नियाज अली फाउंडेशनचे अध्यक्ष अयाज अली, काद्रिया फाउंडेशनचे अध्यक्ष फारुक कादरी,इस्लामपुरा चे समाज सेवक शाहीद मेंबर, एमआयएम चे जिल्हाध्यक्ष अहमद हुसेन,व महानगर अध्यक्ष दानिश सैयद, शिकलगर बिरादरीचे अनवर खान, उस्मानिया पार्क मधील समाजसेवक नाजीम पेंटर व समीर शेख, नगरसेवक प्रतिनिधी अक्रम देशमुख,उमर शेख व रशीद खान यांच्या उपस्थित स्थानिक स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांचा प्रातिनिधिक स्वरूपात शाल पुष्पगुच्छ व सानेगुरुजी लिखित इस्लामी संस्कृती हे पुस्तक देऊन गौरव करण्यात आला .
यांचे सुद्धा मानले आभार
माननीय पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे जे कोरोना आजारात असून सुद्धा त्यांनी आपले सहकारी अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलिस अधिक्षक कुमार चिंता, पोनी किरणकुमार, पोलीस निरीक्षक तालुका पोलीस स्टेशन रामकृष्ण कुंभार व त्यांचे सहकारी तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे सर्व सहकारी, सर्व प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यमाचे आभार मानून त्यांचे समाजा मार्फत अभिनंदन केले आहे.