एरंडोल-(शैलेश चौधरी)-येथील अंजनी नदी काठालगत कित्येक वर्षापासून भिल्ल वस्ती आहे.पण या वस्तीला कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ आत्तापर्यंत झालेला नाही.सदर वस्ती दुर्लक्षितच आहे.विशेष असे की या वस्तीलगतच राज्य महामार्ग क्रमांक ६ असून या वस्तीत रस्ते ,स्ट्रीटलाईट,नळ आदी मुलभूत सुविधा मिळालेल्या नाहीत. याचमुळे डास, रोगराई, अस्वच्छता याचा अतीरेक वाढल्यामुळे जनजीवन धोक्यात आले आहे, या समस्यांबाबत स्थानिक केवडीपुरा भिल्ल समाज रहीवासी बांधव व भिल्ल समाज विकास मंच महाराष्ट्र राज्य संघटना यांचेकडून एरंडोल नगरपालिकेस दिनांक ४सप्टे. रोजी निवेदन देण्यात आले.बाबतच अधिक वृत्त असे की येथील नागरीक प्रत्येक शासकीय योजनेपासून वंचित आहेत,शबरी घरकुल योजनेचा लाभ देखिल आजतागायत कोणालाही मिळालेला नाही ,कित्येकवेळा नगरपालिकेतस रीतसर अर्ज, तक्रार व निवेदने देऊन देखील काहीच उपाययोजना अजुनपर्यंत करण्यात आलेली नाही. नगरपालिका विधानसभा निवडणुकी पूर्वी आम्हांस नागरी मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली, निवेदनावर जिल्हा सचिव दिपक अहीरे, अनिल मोरे, देवराम वाघ, भानुदास भिल, किशोर बागुल, अमोल सोनवणे, प्रकाश अहीरे, शंकर बोरसे, लहू मोरे,रविंद्र वाघ, मधुकर सोनवणे,प्रल्हाद गायकवाड, सुखराम मोरे, विष्णु मोरे, विष्णु वाघ, किरण मोरे, शिवा अहीरे ई. ५० रहीवाश्यांच्या स्वाक्षर्या आहेत. सदर समस्यांबाबत नगरपालिका व सत्ताधारी कितपत लक्ष देतात यावर सर्वांचे लक्ष लागलंय.