<
जळगाव, दि. 9 (जिमाका वृत्तसेवा) :- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विदयापीठाच्या इनक्युबेशन केंद्राव्दारे (केसीआयआयएल) नवीन उदयोग सुरु करण्यासाठी नाविन्यपूर्ण कल्पना नवउदयोजकाकडून मांगविण्यात आल्या आहेत या केंद्रामार्फत आतापर्यंत 20 पेक्षा अधिक जणाना मार्गदर्शन करण्यात आले आहे.
विदयापीठात कौशल्यविकास आणि उदयोजकता विभाग, महाराष्ट्र शासन त्यांच्या सहकार्याने इनक्युबेशन सेंटर सुरु करण्यात आले आहे.
खान्देशात उदयोजकीय विस्तार व्हावा असा या सेंटरचा उद्देश आहे तरुण उदयोजकाना व विशेषता महाविदयालयामध्ये शिकताना उदयोजक होऊ पाहणाऱ्या तरुणाना या इन्क्युबेशन सेंटरमार्फत सर्व प्रकारची मदत दिली जाते. गेल्या वर्षभराच्या काळात केसीआयआयएलने कृषी, आरोग्य, अन्नप्रक्रिया, सायबर आदि क्षेत्रात काम करणाऱ्या 20 पेक्षा अधिक स्टार्टअपना मदत केली आहे.
या पाश्वभूमीवर मार्च 2022 पासून नवीन बॅच सुरु होणार आहे. उदयोग सुरु करण्यासाठीच्या नवीन कल्पना मागविण्यात आल्या आहेत. नव उदयोजक होऊ इच्छिणाऱ्यांनी https://forms.gleGHUozvdrrRryU६zY८ येथे अर्ज करावेत. या केंद्राकडून उदयोगासाठी तात्रिक आणि व्यावसायिक मार्गदर्शन प्रयोगशाळेची सुविधा, बाजारपेठेचे मार्गदर्शन पेट्टसाठी मार्गदर्शन आणि अर्थ सहाय्य केले जाणार आहे.
15 फेब्रुवारी पर्यंत इच्छूकानी अर्ज करावेत आणि अधिक माहिती करीता मनवीन चढ्ढा, मुख्य कार्यकारी अधिकारी (8384002154) आणि निखिल कुळकर्णी व्यवस्थापक (9970016211) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केंद्राचे संचलाक प्रा भूषण चौधरी यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.