<
आकाश धनगर यांचा सत्कार करताना फारुक शेख सोबत डावीकडून भरत आमले,नीलेश गावंडे,रवींद्र धर्माधिकारी, शोभराज खोंडे,अरविंद देशपांडे अब्दुल मोहसिन व प्रवीण ठाकरे दिसत आहे
आँल इंडिया चेस असोशिएशन तर्फे आयोजित ऑनलाइन राष्ट्रीय बुद्धिबळ पंच परीक्षेचे आयोजन २०२०-२१ मध्ये आयोजित करण्यात आले होते या पंच परीक्षे साठी ५ दिवस रोज ८ ते ९ तास प्रशिक्षण देण्यात आले होते त्याच्या अंतरगत त्याची प्रक्टिकल परीक्षा व थेरी परीक्षा ऑनलाइन घेण्यात आली होती या राष्ट्रीय स्तरावरील ऑनलाइन पंच परीक्षेचा निकाल नुकताच जाहिर करण्यात आला असून त्यात जळगाव ज़िल्लाह बुद्धिबळ संघटनेचे प्रशिक्षक तथा विद्यापीठ खेळाडू आकाश धनगर व आंतरराष्ट्रीय खेळाडू आफ्रीन देशपांडे है दोघी या परीक्षेत पास झाले असुन जळगाव जिल्हातील पहले सीनियर नँशनल आबिँटर झाले त्यानी जिल्हाचे नाव पंच परीक्षेत उंचावले आहे.
आता ते भारतात होणाऱ्या बुध्दिबळ स्पधँत आबिँटर म्हणुन काम करू शकतील त्याना नँशनल आबिँटर चा दजाँ देण्यात आला आहे.
बुद्धिबळ संघटनेने केला गौरव
महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे खाजिनदार फारूक शेख यांच्या अध्यक्षते खाली एका छोटे खानी कार्यक्रमात त्यांना प्रमाणपत्र,गुच्छ व शाल देऊन ग़ौरविन्यात आले या वेळी महाराष्ट्र आर्बिटर कमेटी चे सचिव प्रवीण ठाकरे, ज़िल्लाह बुद्धिबळ संघटनेचे रविन्द्र धर्माधिकारी,अरविंद देशपांडे,भरत आमले, नंदुरबार बुद्धिबळ प्रशिक्षक शोभराज खोंडे व नीलेश गावंडे, फुटबॉल प्रशिक्षक अब्दुल मोहसिन, बास्केटबॉल प्रशिक्षक वाल्मीक पाटिल,ताइक्वांडो प्रशिक्षक अजित घारगे, बैडमिंटन प्रशिक्षक किशोरसिंग,टेबल टेनिस प्रशिक्षक विवेक आळ्वनी, यांची उपस्थिति होती।
यांनी केले अभिनंदन
अध्यक्ष अतुल जैन,सचिव नंदलाल गादिया, शकील देशपांडे ,संजय पाटील, चंद्रशेखर देशमुख, पद्माकर करणकर, यशवंत देसले, नरेंद्र पाटील, तेजस तायडे, अंजली कुलकर्णी, रेखा पाटील ,विवेक दानी ,आर के पाटील आदींनी अभिनंदन केले.