<
जळगाव (प्रतिनिधी) : मूळ पेण येथील राहिवासी व मधुकर सहकारी साखर कारखान्याचे माजी सांस्कृतिक संचालक पांडुरंग घांग्रेकर यांचे आज (दि.१०) सकाळी पेण येथे दुःखद निधन झाले.
त्यांनी केलेल्या कार्यात महत्त्वाचे म्हणजे त्याकाळी होणाऱ्या अनागरी स्पर्धेतील मरी जायझो हे नाटक लेवागणबोलीतील अनागरी स्पर्धेतील पहिले नाटक. समाजातील हुंडाप्रथेविरोधात आवाज उठविणाऱ्या या नाटकाचे लेखन मूळ आसोदा येथील राहिवासी असणारे तत्कालीन सांस्कृतिक कार्य संचालनाचे उपसंचालक भास्कर चौधरी यांनी केले होते. या नाटकाचे अनेक ठिकाणी प्रयोग झालेत. त्यांनी पाटलाची औलाद, देवावर मात, बदला, राम जानकी, संगीत झाला महार पंढरीनाथ या नाटकांच्या लिखाणासह ताटी उघडा ज्ञानेश्वरा, हुतात्मा, जंमत जगावेगळी, विघ्नहर्ता, होळी, सत्य वदे वचनाला, अहल्याबाईचा न्याय, कोणता झेंडा घेऊ हाती? या बालनाट्यांचे तर एक ओट का सवाल है, चष्मेबहाद्दर या एकांकिकांचे लेखन केले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे.