Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

दुर्मिळ “गुलेंन बारे सिंड्रोम” च्या रुग्णावर यशस्वी उपचार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/02/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
दुर्मिळ “गुलेंन बारे सिंड्रोम” च्या रुग्णावर यशस्वी उपचार

  • हातापायांच्या कमजोरीसह श्वास घ्यायला होता त्रास
    *शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाला यश

जळगाव (प्रतिनिधी) : हातापायाला अचानक कमजोरी आल्यानंतर श्वास घ्यायला त्रास होऊन गंभीर झालेल्या रुग्णाला वाचविण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या पथकाला यश आले आहे. उपचारांती पूर्ण बरा झाल्यानंतर त्याला अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या उपस्थितीत रुग्णालयातून निरोप देण्यात आला.

साहेबराव संतोष चव्हाण (वय ५२, रा. गोपाळपुरा,जळगाव) यांना हातापायामध्ये कमजोरी येणे तसेच श्वास घ्यायला त्रास होत होता. त्याला उपचारासाठी ३१ जानेवारी रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यावेळी तपासणी केली असता त्याला गुलेंन बारे सिंड्रोम हा आजार झाल्याचे निष्पन्न झालं. रुग्णाला तातडीने अतिदक्षता विभागात उपचार सुरु करण्यात आले.

गुलेंन बारे सिंड्रोम हा अत्यंत दुर्मिळ आजार आहे. या रुग्णाला महागडे ‘इम्युनोग्लोबीन’ औषधदेखील देण्यात आले. उपचारासाठी महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून रुग्णाला लाभ देण्यात आला. साधारणपणे दहा दिवस यशस्वीपणे उपचार केल्यावर रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा झाली. त्यानंतर अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या उपस्थितीत रुग्ण साहेबराव चव्हाण यांना रुग्णालयातून निरोप देण्यात आला. यावेळी औषधवैद्यक शास्त्र विभाग प्रमुख डॉ. भाऊराव नाखले उपस्थित होते. उपचारासाठी वैद्यकीय अधिक्षक डॉ. विजय गायकवाड, डॉ. इम्रान तेली, डॉ. तुषार सोनवणे, डॉ. संदीप बोरसे, डॉ. संतोष पोटे, डॉ. सुबोध महल्ले, कक्ष १४ च्या इन्चार्ज सिस्टर माया सोळंकी, कक्ष ९ चे इन्चार्ज ब्रदर तुषार पाटील यांच्यासह वैद्यकीय पथकाने उपचार केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

नाट्ययोगी पांडुरंग घांग्रेकर यांचे निधन

Next Post

रेल्वे सवलत प्रक्रिया,दिव्यांग तपासणीसाठी कुपन सेवा दररोज;दिव्यांग मंडळाचे आवाहन

Next Post
रेल्वे सवलत प्रक्रिया,दिव्यांग तपासणीसाठी कुपन सेवा दररोज;दिव्यांग मंडळाचे आवाहन

रेल्वे सवलत प्रक्रिया,दिव्यांग तपासणीसाठी कुपन सेवा दररोज;दिव्यांग मंडळाचे आवाहन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo