<
जळगाव – छातीतील तीव्र वेदनेने विव्हळत असलेल्या रुग्णाने अनेक रुग्णालयाचे दार ठोठावले. मात्र रुग्णाची प्रकृती पाहत अनेकांनी त्यास नाकारले. अशा अवस्थेत हृदयालयात आलेल्या ५१ वर्षीय रुग्णाला गोदावरीने तारल्याचीच प्रचिती रुग्णाच्या कुटूंबियांना दिसून आली. सुट्टीच्यादिवशी सुद्धा रुग्णाला इमरजन्सी सेवा देत डीएम कार्डियोलॉजिस्ट यांनी तात्काळ एन्जीओप्लास्टी करत बंद असलेली रक्तवाहिनी मोकळी केल्याने रुग्णाची प्रकृती आता स्थिर आहे.
एका ५१ वर्षीय रुग्णाला छातीत वेदना झाल्या आणि त्यांना अस्वस्थता जाणवली, त्यात हृदयाची गती मंदावल्याने श्वासोच्छवासासही अडचण निर्माण झाली. अशा अवस्थेत नातेवाईकांनी रुग्णाला अनेक रुग्णालयात नेले मात्र प्रकृती फारच खालावल्याने रिस्क जास्त होती, त्यामुळे रुग्णालयांनी नाकारले मात्र डॉ.उल्हास पाटील रुग्णालयाने तात्काळ रुग्णाला दाखल करुन घेतले. डीएम कार्डियोलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील यांनी तात्काळ ईसीजी, टू डी इको काढून घेण्यास सांगितले असता त्यात रुग्णाला तीव्र हृदयाचा झटका आल्याचे निष्पन्न झाले. नातेवाईकांना रुग्णाच्या परिस्थीतीची माहिती देवून समुपदेशन करण्यात आले, त्यानंतर लगेचच एन्जीओग्राफी केली असता मुख्य रक्तवाहिन्याच्या मुखाशी एक १०० टक्के ब्लॉक होता, त्यामुळे लगेचच एन्जोप्लास्टी करण्यात येवून स्टेन्टद्वारे तो ब्लॉक मोकळा करुन रक्तप्रवाहास मार्ग मोकळा करुन देण्यात आला. काही वेळ मेडिसीन विभागाच्या अतिदक्षता विभागात रुग्णाला ठेवण्यात आले. आता रुग्णाच्या हृदयाचे ठोके पूर्ववत झाले असून रुग्णाची प्रकृती स्थिर आहे.
डीएम कार्डियोलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील, डॉ.प्रदिप देवकाते यांनी रुग्णाची एन्जीओप्लास्टी केली. त्यांना तंत्रज्ञ वैभव वाणी, जयेश जोश, गोल्डी सावले, अमोल पाटील, दिपाली भामरे, कुंदन भंगाळे, ललिता भिरुड, डिंपल पाटील, राहुल नेहते, प्रांजली घोटांगले, सुरज नारखेडे आदिंचे सहकार्य लाभले.
हृदय रुग्णांसाठी गोल्डन अवर्स महत्वाचे
छातीत कळा किंवा तीव्र वेदना जाणवल्यास हे हृदयविकाराचे सर्वात मोठे लक्षण मानले जाते. अशा परिस्थीतीतील हृदय रुग्णांसाठी गोल्डन अवर्स खुप महत्वाचे असतात. हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांसाठी सुरवातीचे दोन तास आणि त्यानंतच्या १२ तासात एन्जीओग्राफी, एन्जीओप्लास्टी झाल्यास रुग्णाचा जीव वाचविण्यास मदत होते.
- डॉ.वैभव पाटील,
डीएम कार्डियोलॉजिस्ट
डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय.