<
जळगाव – (प्रतिनिधी) – धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचलित लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय जळगाव येथील विद्यार्थ्यांना “उच्च शिक्षण घेत असताना विविध सामाजिक शास्त्रांमध्ये सुवर्णसंधी” या एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन संपन्न झाले.सदर कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राकेश चौधरी , एकलव्य अकॅडमी यवतमाळ येथील स्वयंसेवक विकेश भगत , नैतिक दांडगे , कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. जुगल घुगे प्राध्यापक वृंद व महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.प्रा. जुगल घुगे कार्यक्रमाचे प्रास्ताविक करीत असताना महाविद्यालयाच्या career guidance and placement cell अंतर्गत विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी विविध संस्थांमार्फत कार्यक्रमांचे आयोजन हे महाविद्यालयात केले जाते. याच दृष्टिकोनातून आज आपण यवतमाळ येथील एकलव्य अकॅडमी यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेत असताना विविध सामाजिक शास्त्रांमध्ये देखील सुवर्णसंधी प्राप्त होऊ शकते याच मुळ संकल्पनेवर आजचा कार्यक्रम संपन्न होतो आहे.
यवतमाळ येथील एकलव्य अकॅडमीचे विकेश भगत यांनी विद्यार्थ्यांशी मैत्रीपूर्ण संवाद साधत ग्रामीण भागातील पहिल्या पिढीतील शिक्षित विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. तरुणांना उज्वल भविष्यासाठी अनेक प्रश्न असतात. विद्यापीठीय शिक्षण घेत असताना मी नेमका कोणता मार्ग अवलंबवावा. ? हा मूळ प्रश्न भेडसावत असतो. डॉक्टर , इंजिनीअर , स्पर्धा परीक्षा अशा नैमित्तिक विद्याशाखाचे चयन केल्यास आपले भविष्य उज्वल होऊ शकते. हि धारणा बहुतांश तरुणांची असते. म्हणूनच बहुतांश तरुणांचा कल याच विद्याशाखा कडे असतो. परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेत असताना विविध सामाजिक शास्त्रांमध्ये देखील उत्तुंग भरारी घेता येऊ शकते त्याच उत्तम उदाहरण हे यवतमाळ येथील एकलव्य अकॅडमी आहे.
आमच्या एकलव्य अकॅडमी तर्फे अंदाजे ५०० तरुण हे परदेशातील व देशातील नामांकित संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेत आहेत. आणि काही तरुण नामांकित संस्थेमध्ये चांगल्या पगारावर नोकरी देखील करीत आहेत. यवतमाळ येथील एकलव्य अकॅडमी चे संस्थापक श्रीयुत राजू केंद्रे आहेत. या आर्थिक वर्षाच्या फोर्ब्सच्या प्रभावी तरुणांमध्ये या ग्रामीण तरुणांचा समावेश झालेला आहे. म्हणूनच विद्यार्थी मित्रहो आपण जर ध्येयवेडे झालात तर ही संधी आपल्याला देखील मिळू शकते. आणि त्यासाठी यवतमाळ येथील एकलव्य अकॅडमी ही आपल्याला पुरेपूर सहकार्य करण्यासाठी तत्पर आहे आपल्या महाविद्यालयातील career guidance and placement cell अंतर्गत आपणास या सुविधा भविष्यात मिळतीलच असे आश्वासन देतो आणि थांबतो.कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राकेश चौधरी यांनी “युवा शक्तीला योग्य मार्गदर्शन हेच त्यांच्या विजयाचं गमक” हे ब्रीद वाक्यच आपल्या धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी या संस्थेचे आहे. या उद्देशातुनच आज आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाचे आयोजन याच दृष्टिकोनातून झालेला आहे असं या ठिकाणी नमूद करावंसं वाटतं. यवतमाळ येथील एकलव्य अकॅडमी चे स्वयंसेवकांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. त्यांची जिद्द बघून निश्चितच या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या देखील महाविद्यालयाचे विद्यार्थी या सुवर्णसंधी कडे ध्येय वेडे होऊन बघतील ही आशा या कार्यक्रमाच्या निमित्ताने या विद्यार्थ्यांकडे महाविद्यालयाचा प्राचार्य या नात्याने करतो. असे प्रतिपादन केले.सूत्रसंचालन डॉ. भुषण भामटेराजपूत व आभारप्रदर्शन डॉ. प्रशांत भोसले यांनी केले.