<
जळगाव – येथील अंजुमन तालिमुल मुस्लेमिन संचलित मौलाना अबदुर रज्जाक अँग्लो उर्दू हायस्कूल येथे दहाविच्या विद्यार्थ्यांसाठी उच्च व तंत्रशिक्षण विभाग, मुंबई व शासकीय तंत्रनिकेतन यांच्या संयुक्त विद्यमाने स्कूल कनेक्ट या कार्यक्रमाद्वारे करिअर मार्गदर्शन करण्यात आले.
मुख्याध्यापक डॉ.बाबू शेख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमात शासकीय तंत्रनिकेतनचे अधिव्याख्याता आसिम खान, गोदावरी पॉलिटेक्निकचे शफीकुर्रहेमान यांनी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक एस.एम.फारुक, जलील अहमद, अमजद, हुमायूँ यांची उपस्थीती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जाहिद हूसेन यांनी केले.
दहावीच्या विद्यार्थ्यांना स्कूल कनेक्ट मार्गदर्शन
जळगाव – भुसावळ येथील एमआयतेली विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी उच्च व तंत्रशिक्षण विभाग, मुंबई व शासकीय तंत्रनिकेतन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने स्कूलन कनेक्ट या कार्यक्रमाद्वारे करिअर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शक म्हणून शासकीय तंत्रनिकेतनचे अधिव्याख्याता आसिम खान, गोदावरी पॉलिटेक्निकचे शफीक कुर्रहेमान यांची उपस्थीती होती. तंत्रशिक्षणाचे महत्व, विविध पदविका अभ्यासक्रम पदविका प्रवेशाचे नियम, तंत्रशिक्षणातील नोकरीच्या संधी, स्वयंरोजगाराच्या संधी याबाबत विद्यार्थ्यांना विस्तृत माहिती देण्यात आली. मुख्याध्यापक सैय्यद वाजिद अली उपस्थीत होते. प्रास्ताविक चंद्रशेखर भारंबे यांनी केले. कार्यक्रमाच्या अखेरीस शिक्षक इम्रान यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी पदाधिकारी व सर्व शिक्षक यांचे सहकार्य लाभले.