<
आंतर महाविद्यालयीन बुध्दिबळ स्पर्धेत आकाश धनगर व साक्षी शुक्ला प्रथम
सांघिक गटात मुलांमध्ये रायसोनी तर मुलींमध्ये कोटेचा महाविद्यालय भुसावळ प्रथम
भुसावळ:-दिनांक २२ व २३ फेब्रुवारी रोजी भुसावळ येथील सरस्वती विद्या प्रसारक मंडळ संचलित श्रीमती प क कोटेचा महिला महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव विभाग आंतरमहाविद्यालयीन बुध्दिबळ (पुरुष व महिला) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत पुरुष गटाच्या ०७ तर महिला गटाच्या ०५ महाविद्यालयाच्या ४१ खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला होता.
स्पर्धेचे उद्घाटन जळगाव विभाग क्रीडा समितीचे सहसचिव प्रा. डॉ. पी.आर. चौधरी व कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभारी प्राचार्य डॉ.जे.व्ही.धनविज यांनी बोर्डावर चाल करून उदघाटन केले.
जळगाव विभागातील प्रा. डॉ. गोविंद मारतळे यांची प्रोफेसरपदी पदोन्नती व डॉ. मुकेश पवार यांची अमरावती येथे झालेल्या राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरात राष्ट्रीय धनुर्विद्या प्रशिक्षक लेवल -१ पात्र झाल्याबद्दल कार्यक्रमाचे अध्यक्ष यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा. वाय. डी.देसले यांनी केले. स्पर्धे प्रसंगी प्रा. किरण नेहेते, प्रा. डॉ. संजय चौधरी, प्रा. चांद खा, प्रा. संजय जाधव, प्रा. विजय महाजन, विनय महाजन, डॉ. अनिल पाटील, डॉ. विशाल भारुड, प्रा. अतुल गोरडे, प्रा. डी आर क्षिरसागर यांची उपस्थिती होती. स्पर्धेसाठी पंच म्हणून प्रवीण ठाकरे, प्रा. विकास महाजन, संजय पाटील रविंद्र धर्माधिकारी यांनी काम पाहिले.
स्पर्धा यशस्वितेसाठी महाविद्यालयातील प्रा. अशोक निकम, प्रा. एस.डी. वंजारी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकार्य लाभले. स्पर्धेचा निकाल
पुरुष गट- विजयी-जी.एच.रायसोनीIBM, महाविद्यालय जळगाव उपविजयी- पी ओ नाहाटा महाविद्यालय, भुसावळ तृतीय-मु.जे.महाविद्यालय, जळगाव. महिला गट- विजयी – श्रीमती प.क.कोटेचा महिला महाविद्यालय भुसावळ उपविजयी-के.सी.ई.चे विधी महाविद्यालय जळगाव. तृतीय-डॉ.जी डी बेंडाळे महिला महाविद्यालय जळगाव.
वयक्तिक निकाल
आकाश धनगर के सी इ शा.शि महाविद्यालय
प्रथम,
अनिकेत जयस्वाल व्दितीय नहाटा महाविद्यालय
परीक्षित माळी तृतीय
रायसोनी महाविद्यालय
कार्तिक पाटील चतुर्थ
श्रेयस अवतारे पाचवा
रायसोनी महाविद्यालय
मुली निकाल
साक्षी शुक्ला प्रथम विधी महाविद्यालय
श्रुती पटकरी द्वितीय
जी डी बेंडाळे महाविद्यालय
रिद्धी भाटीया तृतीय
मु जे महाविद्यालय
श्रुती काबरा चतुर्थ
विधी महाविद्यालय
मोहिनी नागरुत पाचवी
कोटेचा महाविद्यालय भुसावळ.