<
ग्रामपंचायत तांदुळवाडी सरपंच , उपसरपंच व सर्व सन्माननीय सदस्य यांच्या प्रयत्नांना यश आले. तांदुळवाडी गावातील पाण्याचा प्रश्न हा जवळपास यशस्वी झाला आहे जल ही जीवन मिशन अंतर्गत शासनाने प्रत्येक घरापर्यंत नळाचे शुद्ध पाणी पोहोचवण्याचा संकल्प केला आहे. या योजनेअंतर्गत तांदुळवाडी गावाला पाणीपुरवठा योजना मंजूर झाली असून ग्रामपंचायतीच्या वतीने १३९.८० लक्ष रुपयाचा प्रस्ताव पाठवला होता सदर प्रस्ताव मंजूर करण्यात आला पाणीपुरवठ्यासाठी १३९.८० लक्ष रुपयाच्या कामास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे या अनुषंगाने आता तांदुळवाडी गावातील पाणीपुरवठा योजनेचा मार्ग मोकळा झालेला आहे.
जल हे खऱ्या अर्थाने जीवन असून योजनेच्या माध्यमातून गावाला जलसंजीवनी मिळणार असून योजनेच्या अचूक पाणीपुरवठा योजना पूर्णत्वाला आल्यानंतर गावातील विपुल प्रमाणात पाणीपुरवठा होणार ही आनंदाची बातमी ऐकताच तांदूळवाडी गावातील ग्रामस्थांचे मन आनंदाने भरून आले. १८-०२-२०२२ जळगाव येथे पाणी पुरवठा मंत्री नामदार गुलाबराव पाटील व पारोळ्याचे आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते प्रशासकीय मान्यता मिळाली आहे या सर्व प्रयत्नांना तांदूळवाडी येथील सरपंच ,उपसरपंच व नव तरुण तडपदार नकुल पाटील यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.