<
पाळधी – (प्रतिनिधी) – येथील इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल येथे आज दि. २८/०२/२०२२ रोजी “मराठी राजभाषा दिन व राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला या वेळी शाळेचे अध्यक्ष इंजि श्री. नरेश चौधरी यांच्या हस्ते “ कवी कुसूमाग्रज व आधुनिक भारताचे महान वैज्ञानिक ‘भारतरत्न’ डॉ. सी. व्ही रमन ” यांचा प्रतिमेचे पुजन करण्यात आले या वेळी शाळेच्या प्राचार्य परवीन मॅम यांची उपस्थितीती होती.
या वेळी विदयार्थ्यांनी मराठी राजभाषा दिना निमित्त कवी कुसुमग्रज यांचा विषयी भाषणे व मराठी भाषेचे महत्व् विदयार्थ्यांनी भाषण व काव्यांव्दारे विशद केले तसेच राष्ट्रीय विज्ञान दिना निमित्त विदयार्थ्यांनी विविध विज्ञानाचे प्रात्याक्षिक सादर केली व त्या व्दारे विज्ञानाचे महत्व विदयार्थ्यांनी पटवून दिले या वेळी प्राचार्य परवीन मॅम यांनी विदयार्थ्यांना आजच्या आधुनिक युगातील विज्ञानाचे सर्वच क्षेत्रातील वाढलेले महत्व विविध उदाहरणाव्दारे मार्गदर्शन केले.
या वेळी शाळेचे प्राचार्य, परवीन मॅम, समन्वयक. श्री.जी.डी.पाटील सर व समस्त शिक्षक व शिक्षके-तर कर्मचारी उपस्थित होते.