Tuesday, July 15, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येस “ताल सुरन का मेल” या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
04/03/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येस “ताल सुरन का मेल” या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान आणि भवरलाल ऍन्ड कांताबाई फाऊंडेशन तर्फे जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येस अर्थात सोमवार दि. ७ मार्च रोजी संध्याकाळी ठीक ७ वाजता दसक्कर सिस्टर्स प्रेझेंटस् “ताल सुरनका मेल” या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन कांताई सभागृहात करण्यात आलेले आहे. कार्यक्रमाच्या उदघाटन समारंभासाठी महापौर सौ. जयश्री सुनील महाजन, सौ. ज्योतीभाभी अशोक जैन, डॉ.अनुराधा अभिजित राऊत, डॉ.अमृता प्रवीण मुंढे, तसेच डॉ. शिल्पा किरण बेंडाळे या मान्यवरांची उपस्थिती राहील. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. स्मिता झारे करणार आहेत.

सौ. अश्विनी दसक्कर भार्गवे, कु. ईश्वरी दसक्कर, कु. गौरी दसक्कर, कु. सुरश्री (पूजा) दसक्कर भगिनी या नाशिकमधील संगीतक्षेत्रातील नामांकित घराण्यांपैकी एक म्हणजे दसक्कर घराण्याच्या चौथ्या नवीन पिढीचे नेतृत्व करीत असून संगीतक्षेत्रात सतत नवनवीन, वेगवेगळे, वैशिष्ट्यपूर्ण प्रयोग करीत असतात.

त्यांना संगीतकलेचा वारसा घरातूनच मिळाला. त्यांचे सांगितिक शिक्षण आजोबा जेष्ठ संगीततज्ज्ञ पं. प्रभाकर दसक्कर काका माधव दसक्कर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संवादिनीवादक पं. सुभाष दसक्कर यांच्याकडे तसेच जयपूर ग्वाल्हेर किराणा घराण्याच्या गायकीचे शिक्षण विदुषी अलका देव मारुलकर व विदुषी मंजिरी असनारे केळकर यांच्याकडे झाले. लहानपणीच स्वराज्ञानासारखी अवघड गोष्ट सहज साध्य झाल्याने शास्त्रीय संगीत, उपशास्त्रीय संगीत, अभंग, भजन, गौळण, भावगीते, गझल, फ्युजन यांबरोबरच हार्मोनियम आणि सिंथेसायझर वादनात त्या पारंगत आहेत.

श्री. सुभाष दसक्कर यांच्या देशविदेशातील सांगीतिक देवाणघेवाणीमुळे सगळ्या प्रकारचे संगीत ऐकण्याची, वाजवण्याची, गाण्याची आवड निर्माण होत असतानाच दसक्कर भगिनींनी Vocal Harmony या अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि अनोख्या प्रकाराला सुरुवात केली. हिंदी, मराठी भावगीते, सिनेसंगीतातील लोकप्रिय गीते यांबरोबरच पाश्चिमात्य सिम्फनी घेऊन त्यावर हा आगळावेगळा प्रयोग करणे ही त्यांची खासियत ! मूळ सुरावटीला कुठेही धक्का न लावता गीताचे बोल आणि वाद्यसंगीताच्या धून वरदेखील आवाजाचे वेगवेगळे टोन वापरून Vocal Harmony चे सादरीकरण त्या करतात. त्यांच्या या अनोख्या प्रयोगाचे कौतुक संगीत क्षेत्रातील दिग्गज कलाकार जसे की, पद्मभूषण पं. राजन साजन मिश्रा, पद्मविभूषण पं बिरजू महाराजजी, तालयोगी पं सुरेशदादा तळवलकर, पं विश्वामोहन भट, पं विभव नागेशकर, पं अजय पोहनकर, पं अरविंदकुमार आझाद, विदुषी अश्विनी भिडे देशपांडे, विदुषी मंजुषा पाटील तसेच सिनेसृष्टीतील अनेक नामवंत कलाकारांकडून आणि जगभरातील लाखो चोखंदळ आणि दर्दी रसिकांकडून झालेले आहे.

त्यांनी आजवर अनेक स्वरचना केल्या आहेत. त्यात मुख्यत्वेकरून बंदिशी, रागमाला, तराणे, प्रार्थना, देशभक्तीपर गीते अशा अनेक रचनांचा समावेश आहे.
नुकतीच त्यांनी “ताल सुरनका मेल” या अतिशय आगळ्या वेगळ्या दशरंगी प्रकारची निर्मिती केली. त्यातील शब्द, संगीत, गायन, वादन, संयोजन हे सगळे त्यांचेच असून त्यांच्यावरच चित्रित करण्यात आले आहे. हा नवीन, वैशिष्ट्यपूर्ण आणि आकर्षक प्रकार आजवर संगीतक्षेत्रात कुठेही झाला नाही, असे अनेक दिग्गज कलाकारांनी त्यांना सांगत त्यांचे भरभरून कौतुक केले आहे.

त्यांचे भारतात विविध प्रतिष्ठित महोत्सवांमध्ये अनेक मान्यवर कलाकारांच्या उपस्थितीत गाण्याचे व वादनाचे कार्यक्रम झाले आहेत. यामध्ये वसंतोत्सव पारनेर , सुश्री सीता पवार महोत्सव खंडवा , बालगंधर्व महोत्सव जळगाव , वर्ल्ड हार्मोनियम समीट बंगलोर , निनादिनी संगीत महोत्सव गोवा , देवगांधार संगीत महोत्सव , गोपीकृष्ण संगीत महोत्सव, नाशिक, नवदुर्गा पुरस्कार मुंबई, आदि अनेक ठिकाणी व मुंबई आकाशवाणी, रेड एफएम, माय एफएम अशा रेडिओ वाहिन्यांवर त्यांचे कार्यक्रम झाले आहेत व त्यांनी स्पर्धांचे परीक्षण केले आहे. तसेच ABP माझा , झी युवा , झी 24 तास , कलर्स मराठी या चॅनेल्सवरुन त्यांना कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले.

शक्ती पुरस्कार, ज्ञानगंगा पुरस्कार , रासबिहारी इंटरनॅशनल स्कुल म्युझिक अवॉर्ड, नाशिकचा लावण्यवती पुरस्कार अशा अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी त्यांनासन्मानित केले गेले आहे. त्यांना गायन व वादनासाठी भारत सरकारची मान्यताप्राप्त स्कॉलरशिप मिळाली आहे. तसेच त्यांनी संगीत MA पदवी आणि संगीत विशारद विशेष नैपुण्यासह प्राप्त केले आहे.
लहान मुलांमध्ये शास्त्रीय संगीताची गोडी कशी निर्माण करावी या विषयावर त्यांचे विशेष प्रेम व अभ्यास आहे. लहान मुलांवर संगीत कलेच्या माध्यमातून वेगवेगळे प्रयोग करणे त्यांना आवडते. त्यांनी आजवर बालसाहित्यातील अनेक कवितांना आकर्षक स्वररचना देऊन संगीतबद्ध केले आहे. काही नाटके व एका शॉर्टफिल्म साठी त्यांनी गाण्याची रचना व संगीत संयोजनाचे काम केले आहे.
दसक्कर सिस्टर्स या त्यांच्या युट्युब चॅनल, फेसबुक पेज व इन्स्टाग्राम पेजवर त्या नवनवीन प्रयोग सादर करत असतात.

चांदोरकर प्रतिष्ठानाने जळगावच्या सांस्कृतिक समृध्दी साठी सतत काहितरी वेगळं देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. समस्त महिला वर्गाने चुकवू नये असा हा कार्यक्रम आहे. अर्थात तो सर्व रसिकांसाठी खुला आहे. कार्यक्रम ठीक ७ वाजता सुरू होईल रसिकांनी ६.५० पर्यंत आसनस्थ व्हावे अशी विनंती आयोजकांनी केली आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Twitter
  • Facebook
  • Telegram
  • WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

जैन इरिगेशनमध्ये सुरक्षा सप्ताहाचे आयोजन

Next Post

लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयाचा एन. एस. एस. श्रमसंस्कार शिबिर संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव

लोहारा येथे पावसाळ्यातही तीव्र पाणी टंचाई… आजही होतोय टँकरने गावाला पाणीपुरवठा

गुरु पौर्णिमे निमित्त विविध कार्यक्रमातून डॉ केतकी ताई पाटील यांनी केली गुरूवंदना

प.वि.पाटील व ए.टी. झांबरे विद्यालयाची परिवहन समिती सभा संपन्न

Private:

जामनेर वनक्षेत्रपालांकडून माहिती “निरंक” चा सुर…. नंतर अपूर्ण माहिती देवून सारवासारव करण्याचा प्रयत्न…

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

Video Player
https://youtu.be/TzzuE2yX3DI
00:00
00:00
03:54
Use Up/Down Arrow keys to increase or decrease volume.

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Select Category

    Powered By Tech Drift Solutions.

    No Result
    View All Result
    • Home
    • रोजगार
    • लैंगिक शिक्षण
    • माहितीचा अधिकार २००५
    • शैक्षणिक
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • लेख
    • संपादकीय

    Powered By Tech Drift Solutions.

    whatsapp-logo
    %d

      Notifications