<
जळगाव -उमेद अभियान अंतर्गत जिल्हयातील उत्कृष्ट 300 स्वयंसहायता बचत गटांचा प्रतिनिधी चा मेळावा तापी पाटबंधारे विभागाचा हतनूर विभागाचा हॉल मध्ये नुकताच संपन्न झाला ! मेळाव्यास जि.प. अध्यक्षा रंजनाताई प्रल्हाद पाटील , खासदार रक्षाताई खडसे , खासदार उन्मेश दादा पाटील , जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, एमगिरी संस्था वर्ध्याचे उपसंचालक कर्मराज यादव , विदयापीठाचे संचालक भुषण चौधरी , मनजीत सिंग , निखील कुलकर्णी , सेंट्रल बँक चे मॅनेजर के.के. सिंग , कृषी अधिकारी संजय पवार , अन्न व औषध विभागाचे सहाय्यक आयुक्त विवेक पाटील , वस्तू व सेवा कर विभागाचे उपायुक्त एम .एल. पाटील , आरसेटी डायरेक्टर अर्चना देवरी , आदी मान्यवर उपस्थित होते .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचा प्रकल्प संचालिका मीनल कुटे यांनी करून महिला सक्षमीकरणासंबंध स्वयंसहायता समुहांचा सहभाग महत्वाचा आहे असे प्रास्ताविक गेले
मनोगत व्यक्त करतांना जिल्हाधिकारी यांनी बचत गटांचा महिलांना विविध संधी उपलब्धतेसाठी प्रशासन सर्व सहकार्य करणार व महिलांची विविध उत्पादने ऑनलाईन विक्रीस आल्यास महिलांचा आर्थिक विकास साध्य होण्यास मद्त होईल असे प्रतिपादन जिल्हाधिकारी यांनी केले .
खासदार रक्षा ताईनी महिला च्या संघटन होवून समग्र विकास होण्यास मद्त होईल यासाठी महिलांनी विविध बचत गटांचा माध्यमातून संघटन करणे महत्वाचे आहे !
खासदार उन्मेश दादा महिलांना संबोधन करतांना वाद पेक्षा संवाद महत्वाचा असुन , संवादाने बरेच प्रश्न सुटतील व महिलांचा विकास साध्य होण्यास मद्त होईल असे प्रतिपादन केले .
मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया यांनी महिला सक्षमीकरणासाठी महिला बचत गटांच्या माध्यमातून उमेद अभियानचा दशसुत्री नुसार महिलांनी सक्षमीकरण करणे आवश्यक आहे. तथा महिलांनी उत्पादित केलेल्या प्रोडक्ट ला सर्व जिल्हात मार्कटिग साठी जिल्हा प्रशासनाकडून सहकार्य केले जाईल .
उमेद अभियानाअंतर्गत जळगाव जिल्हासाठी अधिकृत “मुक्ताई ” लोगो चे अनावरण मान्यवराच्या हस्ते करण्यात आले ! जळगाव जिल्हयासाठी ग्रामीण स्वयंसहाय्यता बचत गटांसाठी मुक्ताई ब्रण्ड तयार करून गटांना वेगेळी ओळख देण्याचे काम जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जळगाव , उमेद अभियानाअंतर्गत वेगळा प्रयोग करण्यात आला ! मुक्ताई ब्रण्ड चा लोगो सोबत, जळगाव जिल्हयातील स्वयंसहायता समुहांचा उत्कृष्ट प्रोडक्ट कॅटलॉग चे अनावरण देखील मान्यवराचा हस्ते करण्यात आले !
कार्यक्रमांत उमेद अभियान अंतर्गत जिल्हयातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या 75 महिला कर्मचारी यांच्या सत्कार मान्यवराचा हस्ते करण्यात आला ! सदरील कार्यक्रमास जिल्हयातील 300 स्वयंसहायता समुहांचे प्रतिनिधी उपस्थित होते !
सदरील कार्यक्रमांचे सूत्रसंचालन हरेश्वर भोई यांनी केले तर आभार रामचंद्र पाटील यांनी केले , कार्यक्रम यशस्वीतेसाठी, राहूल इधे , किशोर राणे , लोकेश जोशी , प्रवीण गावंडे व उमेदचे सर्व कर्मचारी अधिकारी यांनी सहकार्य केले !