<
चाळीसगाव प्रतिनिधी :- ग्रामिण पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्यासह पथकाने दिनांक 7 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास 92 लाख 34 हजार रुपये किमतीचा नऊ टन किलो वजनाचा गुटखा माल आणि 20 लाख रुपये किमतीचे कंटेनर असा एकुण 1 कोटी 12 लाख 34 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
त्यांच्या या कारवाईबद्दल कौतुक केले जात आहे. उदयपुर राजस्थान येथून निघालेला गुटख्याचा कंटेनर चाळीसगाव मार्गे मुंबईकडे जात असल्याची गुप्त माहिती चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांना समजली. त्या माहितीच्या आधारे त्यांनी आपल्या सहका-यांच्या मदतीने सापळा रचून ही कारवाई केली. बेलगंगा साखर कारखान्याच्या पुढे रस्त्यावर हा कंटेनर (एचआर 38 एबी 219) – पकडण्यात आला. संशयास्पद कंटेनरला पोलिस स्टेशनला आणून सिल तोडून पाहणी केली असता. त्यात 150 प्लॅस्टीक बारदानात 9 टन गुटखा माल आढळून आला. त्या मालाची किंमत 92 लाख 34 हजार रुपये एवढी आहे. कंटेनरसह एकुण मुद्देमाल 1 कोटी 12 लाख 34 हजार रुपये किमतीचा जप्त करण्यात आला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे यांच्यासह अप्पर पोलिस अधिक्षक रमेश चोपडे, उप विभागीय पोलिस अधिकारी कैलास गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजय ठेंगे, स.पो.नि. रमेश चव्हाण, स.पो.नि. धरमसिंग सुंदरडे, पोलिस उप निरीक्षक लोकेश पवार, हे.कॉ. युवराज नाईक, पोलिस नाईक नितीन आमोदकर, गोवर्धन बोरसे, शांताराम पवार, भुपेश वंजारी, प्रेमसिंग राठोड आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास पो.नि. संजय ठेंगे व पो.ना. शांताराम पवार हे करत आहेत.