<
मुंबई, दि. 9 :- मुंबई शहरातील पश्चिम विभागात काही संस्थांनी शासनाची परवानगी न घेता अनधिकृत शाळा सुरु केल्या असल्याचे शिक्षण विभागास आढळून आले आहे. अशा शाळेत पालकांनी आपल्या पाल्यांना प्रवेश देऊ नये असे आवाहन बृहन्मुंबई पश्चिम विभागाचे शिक्षक निरीक्षक नवनाथ वणवे यांनी केले आहे.
बांद्रा ते दहिसर या भागात दि प्रागतिक एज्युकेशन सोसायटीचे मरोळ प्रागतिक हायस्कूल अंधेरी (पू.) (इंग्रजी), यंग इंडियन स्कूल, जोगेश्वरी (इंग्रजी), इत्तेमाद इंग्लिश हायस्कूल, गोरेगाव (इंग्रजी), जे के पब्लिक स्कूल, गोरेगाव (इंग्रजी), सरस्वती विद्यामंदिर हायस्कूल बोरिवली (हिंदी), सेंट मारिया इंग्लिश स्कूल, कांदिवली या एसएससी मंडळाच्या 5 ते 10 वीचे वर्ग असलेल्या शाळा अनधिकृत असल्याचे शिक्षण विभागास आढळून आले आहे. या शाळांमध्ये पालकांनी आपल्या पाल्यांना प्रवेश घेऊ नये. अन्यथा शैक्षणिक नुकसानीस ते स्वत: जबाबदार असतील, असेही शिक्षण निरीक्षक श्री वणवे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले आहे.