<
आज दिनांक १०- मार्च २०२२ शुक्रवार रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र पाडळसे तालुका यावल येथे १० मार्च क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त व ०८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन केले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सौ. दिपाली ताई चौधरी झोपे होते तर उद्धघाटन स्थानी आश्रय फॉउंडेशन चे अध्यक्ष तथा युवासामाजिक कार्यकर्ते डॉ. कुंदन फेगडे होते कार्यक्रमाचे समन्वयक आशा गट प्रमुख सौ अर्चना ताई सोनवणे सौ निलीमाताई ढाकेआदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे उद्धघाटन डॉ.कुंदन फेगडे यांच्या हस्ते शिक्षणाच्या जननी, समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून विनम्र अभिवादन केले.
डॉ. कुंदन फेगडे यांनी आशा वर्कर ताईंना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. व कोरोना सारख्या महायुद्ध मध्ये महत्वपूर्ण कामगिरी करून कोरोना योद्धा म्हणून आपली जबाबदारी चांगल्या रित्या पार पाडली. त्याच प्रमाणे स्रियांचे जन्म प्रमाण वाढ मध्ये देखील सुद्धा आशाताईंचा मोठा योगदान आहे. आरोग्य बदल तळागाळापर्यंत जण जागृती जर परिपूर्ण करत असेल तर त्या आशाताई आहेत. असे अनेक विषयांवर डॉ.कुंदन फेगडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या वेळी आशा गट प्रमुख सौ निलीमाताई ढाके सौ अर्चनाताई सोनवणे आशा वर्कर सौ कल्पना बाविस्कर सौ मनीषा बाणाईत सौ पुष्पा पाटील सौ श्रद्धा पाटील सौ प्रगती पाटील सौ जयश्री भिरूडसौ रंजना कोळीसौ रेखा झांबरे सौ प्रतिभा बोन्डे सौ विमल कोळीसौ निर्मला भंगाळे सौ सुनीता इंगळे सौ जयश्री सोनवणे सौ रंजना वारके सौ सोनाबाई कोळी सौ सराला जावरे सौ कुसुम पाटील सौ छाया बादशहा सौ सराला सपकाळे सौ रुपाली पाटील सौ रेखा सोनोवणे सौ सुनीता सपकाळे सौ रेखा तायडे सौ अनिता तायडे आदींची उपस्थिती होती.