<
सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा स्मृतिदिन संपन्न झाला. सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्रथम वर्ष विज्ञान शाखेची विद्यार्थिनी कु. प्रियंका भाईदास पाटील व तृतीय वर्ष कला शाखेची विद्यार्थिनी कु. अश्विनी इंगळे या दोन विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांचे जीवन व कार्य यावर आपले मनोगत व्यक्त केले. त्या यावेळी बोलताना म्हणाल्या, की सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणाची पायाभरणी केली. त्यामुळे आमच्यासारख्या मुली शाळा-महाविद्यालयांमध्ये शिकू शकल्या आणि जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये यशस्वीपणे वाटचाल करू शकल्या. आज स्त्रिया भारतात विविध पदांवर दिमाखदार कामगिरी करत आहेत, हे सावित्रीबाई फुले यांच्या कार्यामुळे शक्य झाले.
यावेळी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा. एल.जी. कांबळे, जयंती-पुण्यतिथी समितीचे अध्यक्ष डॉ. एन. व्ही। चिमणकर, डॉ. एस.जी. शेलार, प्रा. एस. एम. झाल्टे, प्रा.डी.ए.मस्की, डॉ. सचिन हडोळतीकर, डॉ. अतुल देशमुख, प्रा. शिवाजी पाटील, प्रा. जनार्धन देवरे, प्रा.प्रदीप वाघ, डॉ. गजानन चौधरी, प्रा. स्नेहा गायकवाड तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.