<
जळगाव ( प्रतिनिधी) – येथील जैन इरिगेशन सिस्टिम्स्, भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशन व गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे जागतिक जल दिनाच्या औचित्याने आज 20 मार्च रोजी महात्मा गांधी उद्यान येथे चित्रकला स्पर्धा संपन्न झाली .अलफैज युसूफ पिंजारी ( ई. 4 थी – अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूल), विद्या विनोद बागुल ( (ई. 4 थी – अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूल), रितेश दिलीप बागुल (ई. 5 वी ए . टी . झांबरे विद्यालय ), दीपिका झानेश्वर पाटील ( ई. 4 थी श्रवण विकास मंदीर ) या विद्यार्थ्यांच्या हस्ते सुरुवातीस तुळस रोपाला जलअर्पण करून आगळया वेगळ्या पद्धतीने स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
जनसामान्यांना पाण्याचे महत्त्व कळण्यासाठी जैन इरिगेशनतर्फे दर वर्षी पाण्याबाबत जनजागृतिचे विविध उपक्रम करण्यात येतात. सकाळी 9 ते 11 दरम्यान पाणी या विषयावर निःशूल्क चित्रकला आयोजण्यात आली होती. शहरातील विविध शाळांमधून विद्यार्थ्यांनी या चित्रकला स्पर्धेत सहभाग घेत भरघोस प्रतिसाद दिला.या स्पर्धेसाठी दोन गट निश्चित करण्यात आले होते.
चित्रासाठी लागणारा कागद आयोजकांतर्फे पुरविण्यात आला. यावेळी स्पर्धक विद्यार्थ्यांना जैन फार्मफ्रेशचे मैंगो ज्यूस वितरीत करण्यात आले. विजेत्या स्पर्धकांच्या चित्रांचे 22 मार्च रोजी जागतिक जल दिनाच्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात चित्रप्रदर्शन मांडले जाईल. याच दिवशी विजेत्या स्पर्धकांना बक्षीस देऊन गौरव केला जाणार आहे.
आनंद पाटिल, गिरीश कुलकर्णी व नितीन चोपडा यांनी सूत्रसंचालन केले.चित्रकला स्पधेच्या यशस्वीते करिता जैन इरिगेशन सिस्टिम्स्, भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशन व गांधी रिसर्च फाउंडेशन , जैन स्पोर्ट्स अकॅडमी चे सहकारी यांचे सहकार्य लाभले.