<
कांचन चौधरी हीचे गौरव करताना एडवोकेट सुभाष तायडे डावीकडून सौ प्रभावती चौधरी, फारुक शेख व प्रवीण ठाकरे आदी दिसत आहे
पॅरा ऑलम्पिक कमिटी ऑफ इंडिया तर्फे २१ वी राष्ट्रीय प्यारा ओलंपिक स्विमिंग चॅम्पियनशिप २०२१-२२ ची सुरुवात उदयपूर येथे २४ ते २८ मार्च दरम्यान होत असून यात दिव्यांग क्षेत्रातील पुरुष व महिला मध्ये कनिष्ठ व वरिष्ठ गट सहभागी होत आहे या स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्यातून एकमेव जैन स्पोर्ट्स अकाडमीची महिला खेळाडू कांचन चौधरी यांची निवड झाली असून तिला काल एका छोटेखानी कार्यक्रमात क्रीडा साहित्य देऊन गौरव करण्यात आले व तिला स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यांनी दिल्या शुभेच्या
जळगाव जिल्हा वकील बार असोसिएशनचे माजी सचिव एडवोकेट सुभाष तायडे यांच्या हस्ते क्रीडा साहित्य देण्यात आले
यावेळी प्यारा ओलंपिक असोसिएशन जळगाव जिल्हा संघटनाचे सचिव फारुक शेख, खजिनदार सौ प्रभावती चौधरी, बुद्धिबळ चे आंतरराष्ट्रीय पंच प्रवीण ठाकरे, टेबल टेनिस चे राष्ट्रीय खेळाडू विवेक अडवाणी, स्विमिंग असोसिएशनचे प्रशिक्षक कमलेश नगरकर ,स्विमिंग असोसिएशनच्या अध्यक्ष सौ रेवती नगरकर,महिला हॉकी असो च्या प्रो डॉ अनिता कोल्हे,महिला समिती च्या निवेदिता ताठे, जैन स्पोर्ट्स अकॅडमी चे अरविंद देशपांडे व रवींद्र धर्माधिकारी, बास्केट बॉल प्रशिक्षक वाल्मिक पाटील व संजय पाटील आदींची उपस्थिती होती.