<
जळगांव(प्रतिनिधी)- हजरत बिलाल रजि. ट्रस्ट जळगांवतर्फे दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा आदर्श शिक्षक पुरस्काराचे आयोजन दि. १०सप्टेंबर २०१९ मंगळवार रोजी वेळ दुपारी २वाजता अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय,जळगांव येथे मोठ्या थाटात संपन्न झाला. सदर पुरस्कार हा शैक्षणिक,क्रीडा, पर्यावरण, योगा या क्षेत्रातील योगदानाबद्दल देण्यात आला. कार्यक्रमामध्ये जळगांव जिल्ह्यातील १०१ शिक्षकांना आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार देण्यात आला. या कार्यक्रमाला सर्व शाळेतून २००हून अधिक शिक्षकांची उपस्थिती लाभली. शिक्षकांच्या विविध कलागुणांना वाव व प्रोत्साहन मिळावे या प्रेरणेने या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.श्री.दिलीप खोडपे (मा.अध्यक्ष जि.प.) होते. तर बक्षिस वितरण सौ.उज्वलाताई पाटील (अध्यक्ष,जि.प.जळगांव) यांच्या हस्ते झाले. तसेच प्रमुख पाहुणे करिम सालार सर (अध्यक्ष, इकराएज्यु.सोसा.),श्री.निळकंठ गायकवाड (मा.प्राचार्य), गनी मेमन(उपाध्यक्ष रेडक्रॉस सोसा.), अफाक मेमन, फिरोज शेख(अध्यक्ष मौलाना आझाद अल्पसंख्यांक फाऊंडेशन),सौ.वैशाली कुराडे(अध्यक्षा सुधाई फाऊंडेशन), दिलीपराव पाटील(अध्यक्ष हनुमानव्यायाम शाळा)संस्थाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलीप खोडपे सर यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन हजरत बिलाल संस्था ही शिक्षणासोबत समाजप्रबोधन तसेच राष्ट्रीय एकात्मतावर नेहमीच कार्य करित असते. तसेच सर्व शिक्षकांना ही शिक्षकदिनाच्या शुभेच्छा दिल्या व संस्था अध्यक्ष सैय्यद अकील पहेलवान यांच्या उल्लेखनीय कार्याचे विशेष कौतुक केले. तर सर्व मान्यवरांनी हजरत बिलाल संस्थेचे कार्याचे व तसेच अध्यक्ष सैय्यद अकील पहेलवान यांचेही कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.दि. १८ऑगस्ट २०१९ रोजी झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत विजेत्यांना मरहूम अब्दुल रशीद मेमन अवॉर्डही या वेळेस देण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी इब्राहीम मुसा पटेल, नईम मेमन, सैय्यद अकील पहेलवान यांनी परिश्रम घेतले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रविण पाटील सर यांनी तर सर्वांचे आभार संस्था अध्यक्ष सैय्यद अकील पहेलवान यांनी मानले.