<
जळगाव-(प्रतिनिधी) – येथील एस. एस. मणियार विधी महाविध्यालयाच्या प्रा.विजेता सिंग यांच्या “Socio legal contribution of Dr. Babasaheb ambedkar in national building ह्या पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल मा.श्री. भगतसिंग कोशियारी यांच्या हस्ते नुकतेच प्रकाशित झाले.
मुंबई येथील राज भवनात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या जयंती दिनी झालेल्या ह्या कार्यक्रम प्रसंगी पुस्तकाचे सह लेखक डाॅ.शर्मिला घुगे,डाॅ.भावेष एच. भराड उपस्थित होते.
ह्या पुस्तकात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांचा समाजवाद,त्यांचे सामाजिक आणि राजकीय न्याय विषयक विचार,धर्म,जात व्यवस्था आणि अस्प्रुश्यते संबंधी विचार,महिला विकास आणि सक्षमीकरणातील डाॅ. बाबासाहेबांचे योगदान,जात आणि अर्थ व्यवस्थतेतील संबंध विषयक विचारांचा आढावा घेण्यात आला आहे.
अशा ह्या महामानवाच्या 131 जयंती दिनी प्रकाशित होणारे हे पुस्तक त्यांच्या कार्याचे आणि जीवनाचे अद्रुष्य पैलू पुढे आणेल अशी अपेक्षा व्यक्त करून मा. राज्यपालांनी पस्तकाचे संपादक आणि लेखकांना शुभेच्छा दिल्या.