<
जळगाव – (प्रतिनिधी) – इयत्ता 12 वी विज्ञान शाखेत शिकत असलेले विदयार्थी तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांत प्रवेश घेण्यास इच्छूक असलेले विदयार्थी, प्राधान्याने विज्ञान शाखेतील विदयार्थी/सीईटी देणारे/डिप्लोमा तृतीय वर्षात शिकत असलेले विदयार्थ्यानी त्यांची जात पडताळणीची प्रकरणे दिनांक – 30 एप्रिल, 22 पर्यत सादर करावीत.
अर्जामध्ये आपला ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक नमूद करावा, जेणेकरुन विदयार्थ्याना त्यांचे प्रकरण वैध झाल्याचा SMS मिळेल आणि जर काही त्रृटी असल्यास त्याबाबतची सुध्दा माहिती वेळीच ई-मेलवर प्राप्त होईल. तसेच प्रकरण ऑनलाईन सादर केल्यानंतर हार्डकॉपी 15 दिवसांचे आंत समिती कार्यालयास सादर करावी, असे बी. यु. खरे संशोधन अधिकारी तथा सदस्यसचिव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती जळगाव यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.