<
जळगाव, (जिमाका) दि. 20 : उप प्रादेशिक परिवहन कार्यालयांत परिवहनेतर संवर्गातील दुचाकी वाहनांची नवीन नोंदणी MH19DY-0001 to 9999 पर्यंतची मालिका लवकरच सुरु करण्यांत येणार आहे.
नवीन मालिकेस 27 एप्रिल, 2022 पासून सुरूवात होत आहे. ज्या वाहनधारकांना आपल्या दुचाकी वाहनांकरीता आकर्षक किंवा पसंतीचा नोंदणी क्रमांक हवा असेल त्या वाहनधारकांनी आपली मागणी उप प्रादेशिक कार्यालय, जळगाव येथे 25 एप्रिल, 2022 रोजी दुपारी 4.00 वाजेपर्यंत सादर करावी.
पसंती क्रमांकाच्या अर्जासोबत वाहनधारकांनी शासकीय शुल्काचा डीडी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांचे नावे तसेच ओळखपत्र कार्यालयात सादर करावे. एकापेक्षा जास्त अर्ज आलेल्या क्रमांकाच्या बाबतीत 26 एप्रिल, 2022 रोजी सायंकाळी 4.00 वाजेपर्यत वाढीव शुल्काचा धनाकर्ष (डीडी) स्वतंत्र बंद लिफाफ्यातून सादर करणे बंधनकारक राहील. 26 एप्रिल रोजी सायंकाळी 4.30 वाजता लिफाफे उघडण्यात येतील व जास्त रकमेचे धनादेश सादर केलेल्या अर्जदारास सदर क्रमांक देण्यात येईल व उर्वरित धनादेश संबंधितांना परत करण्यात येतील याची सर्व संबंधित वाहनधारकांना नोंद घ्यावी. असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव श्याम लोही यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.