<
आज दिनांक २२ एप्रिल २०२२ शुक्रवार रोजी यावल ग्रामीण रुग्णालय यावल येथे “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” वर्षानिमित्त आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार व राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत ग्रामीण रुग्णालय यावल येथे भव्य मोफत आरोग्य मेळाव्या चे आयोजन करण्यात आले होते सदर मेळाव्यास अध्यक्ष स्थानी डॉ.कुंदन फेगडे होते.
सदर आरोग्य मेळाव्याचे तालुका स्तरावर आयोजन करण्यात आलेले असून, मेळाव्यात मोफत आरोग्य विषयक जनजागृती तपासणी, उपचार तसेच लाभार्थ्यांचे “युनिक हेल्थकार्ड आयडी” तयार करण्यात येऊन वितरण करण्यात आले. यावेळी सदर आरोग्य मेळाव्याच्या सर्व विभागात फिरून संबंधित आरोग्य कर्मचारी यांचे कडून सविस्तर माहिती जाणून घेतली व जास्तीत जास्त नागरिकांनी सदर मोफत आरोग्य मेळाव्याचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ कुंदन फेगडे यांनी गरजू रुग्णांना केले.
यावेळी श्री डॉ कुंदन फेगडे,श्री यावल तालुका वैद्यकीय अधिकारी श्री डॉ. हेमंत बऱ्हाटे, यावल वैद्यकीय अधिकारी श्री डॉ. शुभम तिडके, यावल वैद्यकीय अधीक्षक श्री डॉ. बी. बी. बारेला, श्री डॉ निलेश दुसाने, डॉ दिलीप भटकर,डॉ धिरज चौधरी,डॉ प्रशांत जावळे ,डॉ गौरव धांडे डॉ स्नेहल जावळे , डॉ निलेश गडे, चेतन अढळकर श्री डॉ गौरव भोईटे, डॉ वैशाली निकुंभ श्री डॉ अभिषेक ठाकूर श्री डॉ गफूर तडवी श्री डॉ वायकोळे श्री डॉ अलिफ पटेल श्री डॉ आशपाक श्री डॉ शबाना तडवी डॉ प्रवीण तडवी डॉ अमीन तडवी डॉ कमलेश पाटील डॉ मयूर चौधरी, डॉ माधुरी गुंजाळ, यावल तालुक्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी, नानासाहेब घोडके, श्रीनिवास सोनवणे,ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी संपूर्ण प्राथमिक आरोग्य केंद्र प्रमुख, आरोग्य सेविका, आशाताई व कर्मचारी आदींची उपस्थिती होती.