Friday, July 11, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगावात रमजान ईद उत्साहात साजरी- विविध सहा ठराव पारित;राष्ट्रीय एकात्मता व विश्व शांतीचा संदेश

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/05/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
जळगावात रमजान ईद उत्साहात साजरी- विविध सहा ठराव पारित;राष्ट्रीय एकात्मता व विश्व शांतीचा संदेश

पोलिस प्रशासन तर्फे ईदगाह ट्रस्ट ला शुभेच्या देताना अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहा पोलिस अधीक्षक कुमार चिंता व वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रतापसिंग शिकारे सह फारूक शेख,वहाब मालिक, मुफ़्ती हारून,एजाज मालिम,मज़हर खान,ताहेर शेख व अशफाक बागवान दीसत आहे.

ईद च्या नमाज़ साठी उपस्थित जनसमुदाय

अल्लाह संपूर्ण विश्वात शांती नांदू दे, भारतात जे काही जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे त्याला आळा घाल व आम्हा सर्व समाजाला एकोप्याने ठेव अशा आशयाची प्रार्थना मौलाना उस्मान कासमी यांनी केली असता हजारोच्या संख्येने उपस्थित नमाजी यांनी त्यावर आमीन शब्द उच्चारून त्यास अनुमोदन दिले.

जळगाव मुस्लिम ईदगाह ट्रस्टतर्फे अजिंठा चौका वरील मुस्लिम ईदगाह मैदानावर रमजान ईदच्या नमाजचे आयोजन करण्यात आले होते त्यासाठी खास इदगाह मैदानाचे विस्तारीकरण करून विविध ठिकाणी नमाजिंची संख्या ओळखून तशी व्यवस्था करण्यात आली होती अशा प्रकारे सुमारे पंचवीस ते तीस हजार च्या वर लोकांनी नमाज अदा केलेली आहे.

मुस्लिम ईदगाह ट्रस्टतर्फे सर्वप्रथम अध्यक्ष अब्दुल वहाब मलिक यांनी उपस्थित जळगावकरांना ईदच्या शुभेच्छा दिल्या तर जनरल सेक्रेटरी फारुक शेख यांनी सेक्रेटरी रिपोर्ट सादर करून उपस्थितांना ट्रस्टसाठी कसे व किती उत्पन्न मिळते व त्यातून शासकीय देणे किती द्यावे लागतात त्यासोबत इतर धर्मदाय कार्यात किती खर्च होतो याबाबत स्पष्ट व सूक्ष्म अशी आकडेवारी सादर केली.
भविष्यातील ट्रस्टचे संकल्प

१)ईदगाह मैदानाच्या बाहेर मुख्य रस्त्यावर स्वर्गीय अब्दुल गफ्फार मलिक यांच्या नावे सार्वजनिक पाणपोई सुरू करणे
२)जुन्या मुख्य प्रवेशद्वारावर सुशोभिकरण करणे
३) मुख्य जुने प्रवेश द्वाराच्या बाहेर स्वच्छतागृह व सफाई कर्मचारी, सुरक्षारक्षक व लिपिक यांच्यासाठी निवासस्थानाची व्यवस्था करणे
४) सर्वात महत्त्वाचे म्हणजे उपलब्ध शॉपिंग कॉम्प्लेक्स च्या टेरेसवर २५ हजार स्क्वेअर फूट वर अत्याधुनिक दवाखाना सुरू करून ना नफा ना तोटा तत्त्वावर तो चालवणे
हे संकल्प व त्यासाठी लागणार खर्च याची ब्ल्यू प्रिंट सुद्धा फारूक शेख यांनी सादर केली.

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अल्पसंख्यांकांवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध सहा ठराव

आंतरराष्ट्रीय ठराव

(1) फलस्तीन :
इज़्राईलच्या अनेक धार्मिक जमातींनी मस्जिदे अक्सा आणि मस्जिदे सख़रा मधे मागिल दोन सप्ताहात सेना आणि फलस्तीनी मुसलमान यांच्यात अनेक चकमकी उडाल्या. शेकडो नागरिक मृत्यूमुखी पडले आणि जखमी झाले. त्या बद्दल ईज़्राईल आणी त्याच्या सेनेचा आम्ही तिव्र निषेध करत आहे. या चकमकीं मध्ये शहीद आणि जखमी झालेल्या फलस्तीनींना मन: पुर्वक श्रद्धांजली वाहत आहे. याच बरोबर इस्लामी विश्वाचे लक्ष या परिस्थीती कडे वेधून मागणी करत आहे कि फलस्तीन साठी एकजूट होऊन नियोजन बद्धरित्या या समस्येचा समाधान शोधावे

*(2) बरमा (ब्रह्म देश) आणि चीन *अल्ग़ोर मुस्लिम* तसेच बरमा मध्ये अरकानी मुस्लिमां वर विनाकारण होणाऱ्या अत्याचाराची दखल घेत तेथील सरकारां कडे मागणी करत आहे कि ते आपल्या नागरीकांच्या नागरी आणि धार्मिक हक्कांचे रक्षण करतील.
(3) इराक़ आणि सिरिया इराक़ व सिरीयाच्या परिस्थीतीं वर चिंता व्यक्त करुन. मुस्लिम जगता कडे मागणी करत आहे कि तेथील लोकांच्या जेवण, निवाऱ्याची आणि इतर गरजांची पुरती करण्याचे अतोनात पर्यत्न करावे.
(4) रशीया आणि युक्रेन :
रशीया आणि युक्रेनचे युद्ध आता तीसऱ्या महीन्यात पोहोचले आहे. या दरम्यान रशयाच्या हल्ल्याची आम्ही तिव्र निंदा करत आहे. तसेच युक्रेन कडेही मागणी करत आहे कि योग्य शरथींवर त्यानेही तयार झाले पाहिजे. नाहीतर सामान्य नागरीकांना परिणाम भोगावे लागेल..
राष्ट्रीय
(5) भारत :
भारता मध्ये इस्लामो फोबीया (इस्लामचे भय) च्या निमित्ताने जी परिस्थीती बिघडविण्यात येत आहे, त्याच्या मुळे देशाच्या अनेक राज्यां मध्ये दंगलींची स्थिती निर्माण झाली आहे. राजस्थानातील करोली पासून बंगालच्या बसरपूर पर्यंत, बिहारच्या मुज़फ्फरपूर पासून गुजरातच्या हिम्मत नगर पर्यंत, मध्यप्रदेशच्या खरगोन पासून गोवा पर्यंत आणि दिल्लीच्या जहांगीरपूरी पासून करनाटकच्या हुबळी पर्यंत तिरस्काराचे एक वादळ उठले आहे. हे एकाच कथेचे दृष्य आहेत.
मुसलमानांचा हा महासम्मेलन परिस्थीतींना बीघडवणाऱ्या तत्वांची तिव्र शब्दात निंदा करत आहे. शांती व सुव्यवस्था अबाधित राखण्याची जबाबदारी सद्याच्या सरकाची मानत आहे. त्यांनी आपल्या जबाबदाऱ्या प्रमाणिकपणे पार पाडाव्यात, अशी मागणी करत आहे.
(6) हिजाब :
मुसलमानांचा हा महासम्मेलन “हिजाब” ला इस्लामचा अविभाज्य घटक मानत आहे आणि त्याच्या विरूद्ध कोणत्याही स्पष्टीकरणाला योग्य मानत नाही. न्यायालयां कडे मागणी करत आहे कि संविधाना अनुसार निर्णय द्यावेत. त्यांना धार्मिक प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करण्याचे अधिकार नाही. धार्मिक प्रकरणांचे स्पष्टीकरण त्यांचे तज्ञ धर्मगुरू करतील. गरज भसल्यास न्यायालय त्या तज्ञ लोकांची मदत घेऊ शकते. हा महासम्मेलन न्यायालयांच्या हस्तक्षेपाला अयोग्य मानत आहे आणि त्याला सरळ धर्मा मध्ये हस्तक्षेप मानत आहे.

ईदची नमाज संपन्न फारूक शेख यांनी आढावा सादर केल्यानंतर मुफ़्ती हारुन यांनी उर्दू भाषेत प्रवचन केले तसेच इदगाह विस्तारीकरणासाठी झालेल्या खर्चापोटी उपस्थितांना आवाहन करतातच त्या ठिकाणी लागलीच रोख रक्कम
तीन लाख रु व वादा मधे सुमारे साड़े तीन लाख असे एकूण साड़े सहा लाख रुपये चंदा रुपी जमा झाले।

मौलाना उस्मान कासमी यांनी नमाज पठण केले त्यानंतर दुआ केली व सर्वात शेवटी अरबी खुदबा सादर करून इद ची नमाज संपल्याचे घोषित करण्यात आले..
ईदगाह मैदानाबाहेर सामाजिक सलोख्याचे दर्शन
ईदगाह मैदानावर नमाज पठण झाल्यानंतर जे लोक बाहेर जात होते त्यांना प्रशासनामार्फत तसेच काही राजकीय पक्ष व महापौर जयश्री महाजन यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या यात प्रामुख्याने जिल्हा अधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलिस अधिक्षक कुमार चिंता, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिकारे यांची उपस्थिती होती

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे महानगर प्रमुख अशोक लाडवंजारी सह माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर व माननीय रवींद्र भैय्या पाटील यांनी व त्यांचे सर्व सहकारी यांनी सुद्धा मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा प्रत्यक्ष भेटून दिल्या.

ईदगाह मैदानावर यांची होती प्रमुख उपस्थिती

अध्यक्ष वहाब मलिक, सचिव फारुक शेख सहसचिव अनीस शहा, खजिनदार अश्फाक बागवान, उपाध्यक्ष रियाज मिर्ज़ा, माजी अध्यक्ष करीम सालार, जमीयत चे मुफ़्ती हारून, शहर ए काज़ी मुफ़्ती अतीकुर्रहमान, मौलाना सालिक सलमान, माजी उपाध्यक्ष हुसेन मुल्तानी, राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव एजाज मालिक,व्यवसायिक रहीम मलिक, सामाजिक कार्यकर्ते नदीम नालीक, एडवोकेट आमीर शेख, प्रोफेसर डॉक्टर गयास उस्मानी, प्रोफेसर डॉक्टर एम इकबाल,रागिब जागीरदार, सलीम इनामदार, मजहर खान, नगरसेवक रियाज बागवान व अक्रम देशमुख, हबीब इंजीनयर, जाहिद इंजीनयर, आदींची प्रमुख उपस्थिती होती.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Twitter
  • Facebook
  • Telegram
  • WhatsApp

Like this:

Like Loading...

Previous Post

चित्रमय प्रदर्शनाच्या माध्यमातून जनकल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचणार – पालकमंत्री छगन भुजबळ

Next Post

पत्रकारांना शासकीय समित्यांवर संधी देण्याबाबत सकारात्मक विचार करणार;महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या अधिवेशनात मंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन

Next Post
पत्रकारांना शासकीय समित्यांवर संधी देण्याबाबत सकारात्मक विचार करणार;महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या अधिवेशनात मंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन

पत्रकारांना शासकीय समित्यांवर संधी देण्याबाबत सकारात्मक विचार करणार;महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या अधिवेशनात मंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

“घंटा नांद आंदोलन” प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष; न्यायालयाकडून मुक्तता

“घंटा नांद आंदोलन” प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष; न्यायालयाकडून मुक्तता

कासंमपुरा येथे विद्यालयाच्या वतीने पायी दिंडीचे उत्साहात आयोजन

कासंमपुरा येथे विद्यालयाच्या वतीने पायी दिंडीचे उत्साहात आयोजन

सरस्वती विद्या मंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय प्रकटले चिमुकले विठ्ठल

सरस्वती विद्या मंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय प्रकटले चिमुकले विठ्ठल

सरस्वती प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात योग दिन संपन्न

सरस्वती प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात योग दिन संपन्न

क्वांटम संगणन उपक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापकांना प्रशिक्षण;उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती

क्वांटम संगणन उपक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापकांना प्रशिक्षण;उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

Video Player
https://youtu.be/TzzuE2yX3DI
00:00
00:00
03:54
Use Up/Down Arrow keys to increase or decrease volume.

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Select Category

    Powered By Tech Drift Solutions.

    No Result
    View All Result
    • Home
    • रोजगार
    • लैंगिक शिक्षण
    • माहितीचा अधिकार २००५
    • शैक्षणिक
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • लेख
    • संपादकीय

    Powered By Tech Drift Solutions.

    whatsapp-logo
    %d

      Notifications