<
जळगाव – (प्रतिनिधी) – एस.एस. मणियार विधी महाविद्यालयात “साहस” वार्षिक स्नेहसंमेलन २०२२ चे पारितोषिक वितरण जळगावचे उपविभागीय पोलिस अधिकारी श्री कुमार चिंता, केसीई सोसायटीचे सहसचिव अॕड. प्रमोद पाटील, डॉ. नितीन धांडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंचावर प्राचार्य डॉ. बी. युवाकुमार रेड्डी, स्नेहसंमेलन समन्वयक प्रा. जी.व्ही. धुमाळे, स्नेहसंमेलन सचिव दीपक सोनवणे, क्रीडा प्रतिनिधी अजित नगराळे, विद्यार्थीनी प्रतीनिधी ऐश्वर्या मंत्री, प्रविण खिरोळकर हे होते. कार्यक्रमास डॉ. डी.आर. क्षीरसागर, डॉ. रेखा पाहुजा, डॉ. योगेश महाजन, डॉ. विजेता सिंग, डॉ. अंजली बोंदर, प्रा. मतकरी उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री कुमार चिंता यांनी विद्यार्थ्यांना कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कठीण परीश्रम महत्वाचे असून त्यासाठी सातत्य आवश्यक असल्याचे सांगितले. विविध स्पर्धांमध्ये सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर अॅड. पाटील आणि डॉ. धांडे यांनीही मार्गदर्शन केले.
तत्पूर्वी प्राचार्य डॉ. रेड्डी यांनी स्वागतपर मार्गदर्शन केले. यावेळी शैक्षणिक वर्षात विविध स्पर्धांमध्ये राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तत्पूर्वी दोन दिवस फ्रेशर, गायन स्पर्धा, गरबा नृत्य, कायदेविषयक प्रश्नमंजुषा स्पर्धा, संगीत खुर्ची, नृत्य इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांचे परिक्षण अॅड. अमित सोनवणे, अॅड. आनंद मुजूमदार, अॅड. तायडे, मयूर अहिरराव, नयन मोरे, डॉ. विना भोसले, प्रा. प्राची व्यास, अॅड. अतूल सुर्यवंशी, अॅड. जितेंद्र पाटील, अॅड. रजनीश राणे, अॅड. विरेंद्र पाटील, महिमा मीश्रा यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रेया चौरसीया आणि रोहन सावंत यांनी केले तर प्रा. धुमाळे आणि ऐश्वर्या मंत्री यांनी आभार मानले.