<
जळगांव- महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात महाजनादेश यात्रेचे आयोजन करून मा मुख्यमंत्री व भाजप सरकार आपल्या येणाऱ्या निवडनिकी साठी कंबर कसत आहे. जळगांव ,धुळे नाशिक आणि औरंगाबाद येथे या यात्रेचे स्वरूप पाहायला मिळाले, व यात केलेलं अश्वासन ही जनतेला ऐकायला मिळाली.भाजप सरकार स्वतःच्या पाठीवर हात मारत पाठ थोपटून घेत असल्याची चर्चाही काही पक्षांनी केली आहे.अश्याच प्रकारचे खडे बोल छावा मराठा युवा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मा धनाजी येळकर यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत भाजप सरकार ला सुनावले.फसव्या भाजप सरकार च्या फसव्या महाजनादेश यात्रेचे पुण्यातील आयोजन आम्ही हाणून पाडू,या यात्रेला आम्ही रोखु .या विषयी सविस्तर बोलतांना मा धनाजी येळकर यांनी सांगितले की,सरकारने मराठा आरक्षण जाहीर केले, मात्र त्याची अंबलबजावणी आद्यप करण्यात आलेली नाही.विद्यार्थ्यांना शाळेत, कॉलेजात,विविध परीक्षा साठी अजूनही फी सवलत दिली जात नाही.त्या साठी चे अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ देखील कर्ज उपलब्ध करत नसून, नावापुरतेच आहे. एकीकडे हमी भाव जाहीर करून देण्यात आला मात्र तो अद्याप देण्यात आला नाही,संपूर्ण कर्जमाफी ची घोषणा देऊनही लाभार्थ्यांना त्या साठी झगडावे लागत आहे. त्याच बरोबर मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनातील आंदोलकांवर दाखल गुन्हे अजूनही मागे घेतले जात नाहीत ही परिस्तिथी निंदनीय आहे. अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जागेचे भूमिपूजन तीन वर्षे उलटूनही अद्याप काम सुरू होत नाही आहे, या उलट महाराष्ट्राची अस्मिता असलेले गड किल्ले भाड्याने देण्याचा जो दुर्दैवी निर्णय घेतला तो संताप जनक आहे. अश्या फसव्या सरकार कडून काढण्यात येणार असलेली फसवी महाजनादेश यात्रा पुण्यात येणार आहे ,या सरकारला वरील सर्व प्रश्न विचारन्यासाठी व धडा शिकवण्या साठी छावा मराठा युवा महासंघ कडून पदाधिकारी व कार्यकर्ते ही महाजनादेश यात्रा रोखणार असल्याचे, छावा मराठा युवा महासंघाचे संस्थापक मा.धनाजी येळकर, यांनी सांगितले. तर उत्तर महाराष्ट्रातूनही मोठ्या संख्येने या महाजनादेश यात्रेला रोखण्यास छावा युवा कार्यकर्ते हजर राहतील असे जिल्हा अध्यक्ष छावा मराठा युवा महासंघ जळगांव मा अमोलभाऊ कोल्हे, व उत्तर महाराष्ट्र विद्यार्थी आघाडी प्रमुख मा अजय पाटील यांनी सत्यमेव जयतेच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.