<
जळगाव, दि.12 (जिमाका वृत्तसेवा) : – महाराष्ट्र राज्याचे उर्जा मंत्री ना. डॉ. नितीन राऊत हे शुकवार दि. 13 मे, 2022 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे –
शुक्रवार दि.13 मे रोजी सकाळी 8.45 वाजता जळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळयास माल्यार्पण, सकाळी 9.00 वाजता जळगाव येथुन चिचाटी ता. रावेर जि. जळगाव कडे प्रयाण, सकाळी 10.30 वाजता चिचाटी येथे आगमन व 33/11 केव्ही उपकेंद्राचा भुमिपुजन कार्यक्रम, सकाळी 11.00 वाजता मोर धरण येथे आगमन व नियोजित सौर उर्जा प्रकल्प स्थळाची पहाणी, दुपारी 12.15 वाजता भुसावळ औष्णिक प्रकल्प येथे आगमन व राखीव. दुपारी 2.00 वाजता भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र येथे आगमन व महावितरण, महापारेषण, महानिर्मिती, महाउर्जा व विघुत निरीक्षक विभागाचा जळगाव, धुळे व नंदुरबार परिमंडळाचा व मलकापूर, बुलढाणा विभागाची आढावा बैठक स्थळ – औष्णिक विद्युत केंद्राचे सभागृह, सायं 4.00 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम जळगाव व अनुसूचित जाती विभाग कॉग्रेसपक्ष जळगाव यांचे समवेत सुसंवाद स्थळ – औष्णिक विद्युत केंद्राचे सभागृह, सायं 5.00 वाजता भुसावळ येथील 660mw 500mw व 210mw प्रकल्पाची पहाणी, सायं 6 वाजता श्री. प्रविण सुरवाडे जिल्हा अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम जळगाव यांची निवासस्थानी भेट , स्थळ – कलानगर, वाजोळा रोड, भुसावळ, सायं. 6.45 वाजता भुसावळ येथील डॉ. बाबासहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज पुतळयास माल्यार्पण, सायं 7 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशन फोरम जळगाव व अनुसूचित जाती विभाग कॉग्रेसपक्ष जळगाव यांचे वतीने आयोजित भिमोत्सव कार्यक्रम 20-22 कार्यक्रमास उपस्थिती, स्थळ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्राऊंड ( ङि.एस.ग्राऊंड) भुसावळ, रात्री 10.45 वाजता भुसावळ येथुन ट्रेन हावडा दुरांती एक्सप्रेसने नागपुर कडे प्रयाण.