<
यावल-(प्रतिनिधी) – जनसेवा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल” मुळे या ग्रामीण,आदिवासी व परिसरात उपेक्षित, गोर, गरीब, गरजु रुग्णांना कमी खर्चांत चांगल्या सुविधा व उपचार मिळतील असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार गिरिष महाजन यांनी केले ते शहरातील भुसावळ रस्त्यावर रविवारी जनसेवा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या उद्दघाटन प्रसंगी बोलत होते. माजी मंत्री आमदार गिरिष महाजन यांच्या हस्ते थाटात हॉस्पिटलचे उद्द्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार रक्षाताई खडसे या होत्या.
यावल येथे आई हॉस्पिटलचे संचालक डॉ. कुंदन फेगडे यांच्या आई हॉस्पिटल आणि भक्ती इमर्जन्सी सर्हिसेस संचालित जनसेवा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात आले आहे या हॉस्पिटलचे रविवारी माजी मंत्री तथा आमदार गिरीष महाजन यांच्या हस्ते उद्दघाटन करण्यात आले.वृत संकलन शेखर पटेल, या उद्द्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रावेरच्या खासदार रक्षाताई खडसे होत्या. तर प्रमुख उपस्थितीत भाजपा जिल्हाध्यक्ष तथा जळगाव आमदार राजुमामा भोळे, रावेर आमदार शिरिष चौधरी, भुसावळ आमदार संजय सावकारे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष रंजनाताई पाटील, जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील, आरोग्य व शिक्षण माजी सभापती रविंद्र पाटील उर्फ छोटूभाऊ, जिल्हा परिषदच्या माजी सदस्य सविताताई भालेराव, पंचायत समितीच्या माजी सभापती पल्लवीताई चौधरी, हिरालाल चौधरी, नंदकिशोर महाजन, सुरेश धनके, पद्माकर महाजन, कांचन फालक, माजी शिक्षण सभापती हर्षल पाटील, अमोल जावळे, नारायणबापु चौधरी, माजी नगराध्यक्ष शशांक देशपांडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रा. मुकेश येवले, भाजपा तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, बाळु फेगडे, वड्री सरपंच अजय भालेराव, अतुल भालेराव, वढोदा सरपंच संदिप सोनवणे,शिवसेना जिल्हा उपप्रमुख मुन्ना पाटील, भाजपा रावेर तालुकाध्यक्ष राजन लासुरकर, नरेंद्रभाऊ नारखेडे, फैजपूरचे माजी नगराध्यक्ष निलेश उर्फ पिंटू राणे, पंचायत समितीचे माजी उपसभापती दिपक पाटील, फैजपूर शहर भाजपाअध्यक्ष अनंत नेहेते, यावल शहराध्यक्ष डॉ. निलेश गडे, बाजार समितीचे माजी उपसभापती उमेश पाटील, विलास चौधरी, उजैन्नसिंग राजपुत सह सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
यावल न्युज वृतांत या कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता माजी मुख्यध्यापक सुधाकर फेगडे, शैलेंद्र फेगडे, डॉ. कुंदन फेगडे, डॉ. जागृती फेगडे, डॉ. प्रज्ञा विष्णु भोळे, डॉ. प्रशांत जावळे, डॉ. स्नेहल जावळे, भुषण फेगडे, स्नेहल फिरके, मनोज बारी, सागर लोहार, रितेश बारी, व्यंकटेश बारी, परेश नाईक, सोहम कोळंबे सह डॉ. कुंदन फेगडे मित्र परिवार व आश्रय फाऊंडेशनच्या सर्व डॉक्टरांनी परिश्रम घेतले.