<
आज २१ व्या शतकात वावरत असताना अचानक लक्षात येत ते नवयुगात सोशल मीडियाच क्रेझ. क्रेझ म्हणावं की व्यसन? खरं तर हाच प्रश्न सतत मान वर करून डोकावत आहे. आता कोणी म्हणेल छे हो..! हे व्यसन कसल हा तर नविन युगाचा नव्या तंत्रज्ञानाशी जोडणारा मार्ग आहे असे कितीतरी उदाहरणं दाखले देता येतील.तरी पण मी नेटकरांचं हे एक व्यसनच आहे असच म्हणेल.बघा कस..!
खरं तर इंटरनेट-सोशल मीडिया यांना मी काही म्हणतच नाहीय मी त्यांना म्हणतोय ज्यांनी यांचा अतिरेक करणाऱ्यांना. खरं पाहता हे दोघेही अतिशय उपयुक्त असे उदयास आलेले तंत्रज्ञानचं आहे. आज जरी आपण २१ व्या शतकात पदार्पण केलं आहे तरी या २१ व्या शतकात आपल्याला पाहिजे तसं सज्ज करण्याचे काम या दोघांचेच आहे.तुम्हाला प्रश्न विचारला की गावाला जायचं आहे तुम्ही बैलगाडीने जाणार का कार ने? तर साहजिकच उत्तर येईल कारने आणि ते योग्यच आहे. लांब जायचं आहे तर आपण कारचाच उपयोग करायला हवा. पण कार चालवताना स्पीड मोजका हवा स्पीडचा अतिरेक नको,स्पीडचा अतिरेक झाला तर व्हायचाच अक्सीडेन्ट.असच अतिरेक आपल्याला इंटरनेट सोशल मीडिया चा होताना आपल्याला दिसतोय! बघा तुम्हीच तासंतास मोबाईल वर ऑनलाईन असलेले तरुण हि तरुणाई जातेय कुठे… मोबाईलच त्यांचे विश्व होऊन चाललंय. त्यांना कशाचेही भान उरलेले नाहीये. बघा तुम्हीच फक्त लाईट जाऊदे आणि या नेटकऱ्यांच्या मोबाईल मध्ये कमी बॅटरी असू दया मग बघा जसा मासा पाण्याविना कसा तडफडतो तशी गत होते यांची आणि मग झालाच स्वीचऑफ तर मग झालाच चैनच पडत नाही यांना दहा फेऱ्या होतात तिथल्या तिथे आणि या दहा फेऱ्यामध्ये शंभर वेळा यांचा हा एकच प्रश्न असतो केव्हा येईल हि लाईट? हे तर जाऊद्या हो नुसतं नेटपॅक संपू दया अशी स्थिती होते यांची की बस तळीरामचे कसे हळू होतात तसे मग तर बघाच लगेच हे रिचार्ज साठी पळतात. एकदाचा नेटपॅक टाकला की चैन मिळतो यांना मग परत सज्ज नेटकऱ्यांच्या जगात.हे अजिबात मोबाईल आणि इंटरनेट-सोशल मीडिया सोडून राहूच शकत नाही.म्हणून मी तरी इंटरनेट-सोशल मीडिया यांना तरुणाईला जडलेलं एक व्यसनच म्हणेल..!मी मान्य करतो यांचा उपयोगही फार आहेत.पण मित्रानो उपयोग नक्कीच करा पण उगाच अतिरेक करू नका.
“कारण सोशल मीडियावर तर सर्वच टच आहेत,
पण नात्यातलं नातं कुठेतरी हरवत चाललंय आहे.”
मनोज भालेराव(शिक्षक)प्रगती विद्यामंदिर,जळगाव
(मो.नं.८४२१६५५६१)