Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सारोळा विकास सोसायटीत सहकार पॅनलचा दणदणीत विजय

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
20/05/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
सारोळा विकास सोसायटीत सहकार पॅनलचा दणदणीत विजय

पाचोरा -(प्रतिनिधी)
तालुक्यातील सारोळा बुद्रुक – वाघुलखेडा विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत कपबशी चिन्हावर लढलेल्या सहकार पॅनल चा दणदणीत विजय झाला. सारोळा बुद्रुक, वाघुलखेडा व सारोळा खुर्द या तीनही शेतकरी सभासदांची संस्था असलेल्या सारोळा विकास सोसायटीत अत्यंत खिलाडू वृत्तीने झालेल्या या निवडणुकीत मतदार सदस्यांनी शेतकरी पॅनलचा पराभव करीत सहकार पॅनल ला दणदणीत विजय मिळवून दिला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, सारोळा बुद्रुक विकास सोसायटीत प्रत्यक्ष निवडणुकीपूर्वीच सहकार गटाचे महिला राखीव गटातून जनाबाई पाटील व निर्मलाबाई पाटील आणि अनुसूचित जाती जमाती गटातील हिरामण चंदनशिव हे 03 उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. मात्र सहकार पॅनल ला विरोध दर्शवत शेतकरी पॅनलने आपले 4 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरल्याने उर्वरित 10 जागांसाठी दिनांक 20 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली.

अविनाश देशमुख, मुकुंदा पाटील, शिवाजी विक्रम पाटील, उत्तम हवाळे-पाटील, ठाणसिंग पाटील, त्र्यंबक पाटील, शंकर पाटील, खुशालराव देशमुख, अनिलराव देशमुख, नाना ज्योतिराम पाटील, बापू मानसिंग पाटील, महारु तायडे पाटील या पॅनल प्रमुखांच्या नेतृत्वाखाली सहकार गटाने विजयश्री खेचून आणली. सर्व विजयी उमेदवारांनी अत्यंत साधेपणाने आपला विजयोत्सव साजरा केला.

सारोळा विकास सोसायटीतील नवनिर्वाचित उमेदवार व त्यांना मिळालेली मते खालील प्रमाणे

सर्वसाधारण मतदारसंघ–
दिनकर पंढरीनाथ हवाळे (178)
राहुल प्रकाश राव देशमुख (170)
कैलास ठाणसिंग पाटील (164)
गोपाल रामभाऊ पाटील (162)
विलास दयाराम बोरसे (154)
विष्णू मैनाजी पाटील (146)
अशोक शहादु वाणी (141)
शांताराम बाबुराव पाटील (131)

इतर मागास वर्ग मतदार संघ–
लक्ष्मण सांडू पाटील (118)

विमुक्त जाती भटक्या जमाती मतदार संघ
संदीप रमेश पाटील (128)

महिला राखीव मतदार संघ–
जनाबाई सुपडू पाटील (बिनविरोध)
निर्मलाबाई साहेबराव पाटील (बिनविरोध)

अनुसूचित जाती जमाती मतदार संघ
हिरामण ओंकार चंदनशिव (बिनविरोध)

एकूण 320 मतदार सभासद संख्या असलेल्या विकास सोसायटी 250 सदस्यांनी मतदान केले त्यापैकी 30 मते बाद ठरली. श्री एम. डी. नेहते यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. या निवडणूक प्रक्रियेत सहकार विभागाचे राहुल आप्पा बोरसे, अशोक आबा वाणी, प्रकाश दामू बोरसे व ऑडिटर श्री देशमुख साहेब यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

पाचोरा येथे 8 व 9 मे रोजी श्री कैला मातेचा महोत्सव

Next Post

मिशन वात्सल्य योजनेअंतर्गत गठित पथकाच्या माध्यमातून अनिष्ट विधवा प्रथा निर्मूलनसाठी प्रयत्न करा – मंत्री ॲड.यशोमती ठाकूर

Next Post
मिशन वात्सल्य योजनेअंतर्गत गठित पथकाच्या माध्यमातून अनिष्ट विधवा प्रथा निर्मूलनसाठी प्रयत्न करा – मंत्री ॲड.यशोमती ठाकूर

मिशन वात्सल्य योजनेअंतर्गत गठित पथकाच्या माध्यमातून अनिष्ट विधवा प्रथा निर्मूलनसाठी प्रयत्न करा – मंत्री ॲड.यशोमती ठाकूर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d