<
धरणगाव – (प्रतिनिधी) – तालुक्यातील बांभोरी प्रचा गावातील रेशन दुकानात निकृष्ट दर्जाचे धान्य वाटप करण्यात येत असल्याचे दिसून आल्याने तसेच गावातील रेशन लाभार्थ्यांना धान्य कमी प्रमाणात दिले जात आहे तसेच महिलांना असभ्य भाषेत बोलणे,विधवा महिलांना अपमानास्पद वागणूक देने,दुकानात तक्रार नोंदवही ठेवलेली नाही,धान्य घेतल्याची पावती सुद्दा लाभार्थ्यांना देत नाही ,असे प्रत्यक्ष पाहणीतून निदर्शनास आले असल्याचे बाभोंरी प्रचा चे सरपंच सचिन बिऱ्हाडे यांनी तहसीलदार यांच्याकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
दिनांक 23 मे 2022 रोजी तलाठी श्री.गजानन , संदीप कोळी ग्रामपंचायत सदस्य,हिरामण नन्नवरे तसेच गावातील ग्रामस्थ याच्या समक्ष वाटप थांबवून दुकान बंद करण्यात आल्याचे सरपंचांनी सांगितले.
तसेच तक्रारी अर्जात म्हटले आहे की, सदर रेशन दुकानदार यांच्यावर योग्य ती कार्यवाही करून सदर रेशन वाटप दुसऱ्या रेशन दुकानदार कडे देण्यात यावी जेणेकरून लाभार्थ्यांना चांगले धान्य मिळेल व त्रास होणार नाही. तरी सदर रेशन दुकानदारावर काय कार्यवाही होते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागुन आहे.