Saturday, June 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

केळीवरील कुकुंबर मोझॅक विषाणूपासून काळजी घेण्याचे आवाहन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
27/05/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
केळीवरील कुकुंबर मोझॅक विषाणूपासून काळजी घेण्याचे आवाहन


जळगाव, दि. 27 (जिमाका वृत्तसेवा) : जळगाव जिल्ह्यात केळी हे प्रमुख फळपिक असून सुमारे ५० ते ५५ हजार हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड केली जाते. कुकुंबर मोसॅक व्हायरस (सी.एम.व्ही.) हा केळी पिकावरील प्रमुख विषाणुजन्य रोग असून दरवर्षी माहे जुलै ते सप्टेंबर दरम्यान सी. एम. व्ही. रोगाचा मोठया प्रमाणावर प्रादुर्भाव आढळून येतो. त्यापासून काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले आहे.


सततचे ढगाळ वातावरण, जून-जुलै महिन्यात वारंवार पडणारा अखंडित पाऊस, प्रकाशाची तीव्रता कमी असणे व किमान तापमान २४-२५ अंश से. असणे, जास्त आर्द्र हवामान, इत्यादी घटक सी.एम.व्ही. रोगास पोषक असतात. सुरवातीस कोवळ्या पानांवर हरितद्रव्य विरहित, पिवळसर पट्टे दिसणे, पानाचा पृष्ठभाग आकसला जाऊन व कडा वाकड्या होऊन पानांचा आकार लहान होणे, पानांच्या शिरा ताठर होऊन संपूर्ण पान कडक होणे, पानांच्या शिरांमधील भाग काळपट पडून पाने फाटणे, पोग्याजवळीन पाने पिवळे पडून पोंगा सडणे, झाडांची वाढ खुंटणे, इत्यादी लक्षणे सी.एम. व्ही. रोगात आढळतात.
सी. एम. व्ही. विषाणूचा प्राथमिक प्रादुर्भाव रोगट कंदापासून होतो. तसेच या रोगाचा दुय्यम प्रसार प्रामुख्याने मावा किडींच्या माध्यमातून होतो. सी. एम.की. विषाणूची जवळजवळ 1००० यजमान पिके आहेत. सी.एम. व्ही. रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर त्याच्या नियंत्रणासाठी कोणतेही ठोस उपाय करता येत नाही. तथापि सी.एम.की. रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खालील उपाययोजना करणे आवश्यक आहे.


प्रादुर्भावग्रस्त झाडे मुळासकट उपटून दूर ठिकाणी जाळून किंवा गाडून टाकावीत. बागेचे २-३ वेळा ४ ते ५ दिवसांनी नियमित निरीक्षण करून रोगग्रस्त झाडे आढळल्यास त्यांचीही वरीलप्रमाणे विल्हेवाट लावावी.
बागेतील तसेच बांधावरील मोठा केणा, छोटा केणा, धोतरा, काहे रिंगणी चिलघोल, शेंदाड, गाजरे गवत, इत्यादी प्रकारची तणे काढून बाग स्वच्छ ठेवावी. पिकांची फेरपालट करावी. केळीत काकडी, भोपळा, कारली, दुधीभोपळा, गिलके, चवळी, टोमॅटो, वांगे, मिरची, मका या पिकांची लागवड करू नये. तसेच केळी बागेभोवती रान कारली, शेंदळी, कटुर्ले, गुळवेल यासारख्या रानटी झाडांचे वेल नष्ट करावेत. मावा या वाहक किडीच्या बंदोबस्तासाठी डायमेथोएट ३० ई.सी. २० मिली किंवा थायोमिथोक्झाम २५ डब्लू. जी. २ ग्रॅम किंवा इमिडाक्लोप्रीड १७.८ एस. एल. ५ मिली या किटकनाशकांची १० लीटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

‘पीसीपीएनडीटी’ वेबपोर्टलमुळे पारदर्शकता येणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे

Next Post

शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पाणी अर्ज सादर करण्याचे आवाहन

Next Post

शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पाणी अर्ज सादर करण्याचे आवाहन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo