<
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे, पुरस्कृत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED) जळगाव द्वारा आयोजित अनुसूचित जाती(SC) प्रवर्गातील युवक-युवतीं करिता १ महिना कालावधीचा निःशुल्क (अनिवासी) उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदरील प्रशिक्षण एक महिना कालावधीचा असून त्यासाठी १ जून रोजी उद्योजकता विकास प्रशिक्षण परिचय मेळाव्यात उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे, या मोफत उद्योजकता परिचय कार्यक्रमासाठी व निवड मुलाखत पत्ता:- महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, MCED जिल्हा उद्योग केंद्र हाॅल, शासकीय मुलींचे ITI शेजारी, नॅशनल हायवे नं 6 जळगाव. येथे ठिक ११:०० वाजता १- स्वतः चा जातीचा दाखला, २- शाळा सोडल्याचा दाखला, ३- आधार कार्ड, ४- मार्कशीट, ५- पासपोर्ट साईझ फोटो (२) (वरील सर्व कागदपत्रे ओरिजिनल तपासणीसाठी आणि त्याच्या दोन प्रति झेरॉक्स सबमिट करण्यासाठी आणाव्यात), निःशुल्क अनिवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम(EDP) कालावधी : ६ जुन २०२२ ते ५ जुलै २०२२ पर्यंत असून प्रशिक्षणास निवड होण्यासाठी किमान अटी व पात्रता पुर्ण करणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा: किमान १८ कमाल ५० वर्षे , रहिवासी – उमेदवार हा अनुसूचित जाती प्रवर्गातील किमान १५ वर्षांपासून महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा, शैक्षणिक पात्रता: किमान ८ वी पास महिला उमेदवारांना प्राधान्य, स्वःताचा उद्योग व्यवसाय करण्याची प्रबळ इच्छा, कोणत्याही वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा, बार्टी मार्फत स्थापित स्वयं सहाय्यता युवा गट सदस्य असल्यास प्राधान्य देण्यात येईल. प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी व अधिक माहितीसाठी विभागीय अधिकारी, MCED जळगाव/प्रकल्प अधिकारी मो. 9049228888, बार्टी प्रकल्प अधिकारी जळगाव मो. 9975769702, कार्यक्रम आयोजक मो. 9764330011 यांना संपर्क करण्याचे आवाहन जळगाव जिल्हा प्रकल्प अधिकारी युनुस तडवी यांनी केले आहे.