<
जळगाव (प्रतिनिधी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी थेट संवाद साधून त्याद्वारे विविध बाबींकडे देशवासीयांचे लक्ष वेधण्याचा आणि देशाच्या विकासात त्यांना सहभागी करून घेण्याचा मन की बात या उपक्रमातून केलेला प्रयत्न अत्यंत सफल झाला आहे. रविवार दि. २९ मे रोजी सकाळी 11वा. होणाऱ्या या कार्यक्रमात केशवस्मृती प्रतिष्ठान संचालित मातोश्री आनंदाश्रमातील श्रवण कार्यक्रमाचे देशभर थेट प्रक्षेपण करण्यात आले. सामाजिक क्षेत्रातील समाजोपयोगी कार्याच्या आधारे दर महिन्याला थेट प्रक्षेपणासाठी देशभरातून १०-१२ सामाजिक संस्थांची निवड पीएमओ कडून होत असते.२९ मे च्या या कार्यक्रमासाठी देशभरातून १२ तर महाराष्ट्रातून एकमेव अशा सामाजिक,अराजकीय संस्थामधील कार्यक्रमासाठी मातोश्री आनंदाश्रम या प्रकल्पाची निवड झाली होती.
मा मोदीजी यांनी देशांतील युवकांच्या तंत्रज्ञानातील प्रगतिचे,स्टार्टस अपद्वारे योगदानाचे कौतुक केले.स्वच्छता मोहिमांचा गौरव करित तीर्थक्षेत्र यात्रेत भाविकांकडून होत असलेल्या अस्वच्छतेबाबत खंतही व्यक्त केली.एक शेतकरी व त्याचा सेवानिवृत्त जवान भाऊ यांनी उत्तर प्रदेशातील आपल्या गावाला पाणी पुरवण्यासाठी स्वताच्या जमापुंजींचा खर्च केल्याचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला.जपानमधील कलाकारांनी महाभारत व इतर सांस्कृतिक परंपरांचा जपानी भाषेतील लोककलांद्वारे प्रचाराचा मा मोदीजींनी विशेष उल्लेख केला.दिव्यांगासाठी काम करणार्या संस्था व व्यक्तिंचाही त्यांनी गौरव केला.
कार्यक्रमात जळगाव शहरातील चैतन्य जेष्ठ नागरिक संघ, शिरसोली येथील जेष्ठ नागरिक, गणानाम परिवारातील ,रोटरी परिवारातील सदस्य यामध्ये सहभागी झाले होते. परिसरातील निसर्गरम्य वृक्षराजीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
मातोश्री आनंदाश्रम परिसरात यावेळी भव्य LED स्क्रीन ची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या प्रक्षेपणा दरम्यान तीन वेळा थेट प्रक्षेपणात भारतभर मातोश्री आनंदाश्रमातील श्रोतेगण दाखवण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ नागरिकांसह ३५० जण कार्यक्रमाकडे सहभागी झाले होते.माजी मंत्री आ. गिरीश महाजन, केशवस्मृतीचे सचिव रत्नाकर पाटील, क्षुधा शांती संस्थाचे अध्यक्ष संजय बिर्ला, मातोश्री आनंदाश्रम प्रकल्प प्रमुख सौ अनिता कांकरिया, संजय काळे, श्रीकांत वाणी, कल्पना काबरा, संध्या कांकरिया, दिपक सूर्यवंशी,डॉ राधेश्याम चौधरी यांच्यासह केशवस्मृती परिवारातील सदस्य उपस्थित होते. सूत्रसंचालन सागर येवले यांनी तर सौ अनिता कांकरिया यांनी प्रास्ताविक केले. डॉ राधेश्याम चौधरी यांनी कार्यक्रम आयोजनामागची भूमिका विषद केली. यशस्वितेसाठी पवन येपुरे, योगेश पाटील, रोहन सोनगडा, छोटु नेवे, पंकज पाटील, राकेश भोइ, रुपेश भोई, नवल पाटील यांनी परिश्रम घेतले.